कोकण रेल्वेने पाणथळीच्या जागेवरील भराव काढावा : महाड पूर निवारण समितीची मागणी

संजय परांजपे यांनी भराव काढणे या कमी कालावधीतील उपाय योजनां सह सावित्री नदी पात्रातील गाळ उपसणे, जुटे काढणे, महामार्गाचा भराव व अपूर्ण राहीलेली धरणांची कामे या दिर्घ कार्लीन उपाय योजनांचाही पाठपुरावा करण्यात येईल असे स्पष्ट केले. प्रकाश पोळ यांनी दासगांव येथील पाणथळीच्या जागेवरील भराव काढल्यास महाडकरांना पुरापासून ८० टक्के दिलासा मिळेल तर धरणे बांधणे, रेती उपसा, जुटे काढणे, महामार्गावरील भरावातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आणखी मोऱ्या भुयारी मार्ग बनवणे या उपाय योजनांमुळे २० टक्के दिलासा मिळणार आहे हे पटवून दिले.

  जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड शहर व आजुबाजुच्या परिसरात आलेल्या महापूराने यापुर्वीच्या पुराच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने करोडोचे नुकसान झाले. महाड शहरात प्रतिवर्षी येणाऱ्या महापूराच्या संकटावर कायम स्वरूपी तोडगा काढावा व महापुराची कारणे त्यावरील उपाययोजना याचा सखोल अभ्यास करून त्याकरीता शासनाकडे पाठपुरावा करावा यासाठी विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येऊन बनवलेल्या महाड पूर निवारण समिती मार्फत सर्व्हे करून कोकण रेल्वेने दासगांव येथे बांधलेल्या पुलासाठी पाणथळीच्या जागेवर जो भराव करण्यात आला आहे.

  तो काढून पुलाचे पिलर वाढवल्यास महाड शहर व आजुबाजुच्या गावात येणाऱ्या पुराची पातळी कमी होईल असा निष्कर्ष काढण्यात आला असून कमी कालावधीत म्हणजेच येणाऱ्या ९ महिन्यात हा उपाय करणे शक्य असल्याने इतर कारणावरील दिर्घ कालीन उपायांसह कमी कालावधीतील भराव काढण्याचा उपाय मार्गी लावण्यासाठी समस्त महाडकरांनी एकत्रितरित्या पाठपुरावा करावा असे आवाहन महाड पूर निवारण समितीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

  यावेळी भूगोल प्राध्यापक समीर बुटाला, प्रकाश पोळ, संजय परांजपे, नितीन पावले, नगरसेवक संदीप जाधव, संजीव शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
  सुरुवातीस प्रा.समीर बुटाला यांनी एका चित्रफितीव्दारे आत्तापर्यत महाड मध्ये अलेले महापूर त्या त्या वर्षी पडलेला पाऊस आणि पुराची पातळी याची माहिती सादर करून कोकण रेल्वेने दासगांव येथील पुल बांधताना महापूराच्या पातळीचा घेतलेला चुकीचा आधार, पाणलोट क्षेत्रात दाखवलेली मोठी तफावत आणि १५ ऐवजी उभारलेल ११ पुलाचे पिलर आदीचा अहवाल सादर करून या पुलासाठी पाणथळीच्या जागेवर जो भराव टाकण्यात आला आहे तो काढल्यास कमी कालावधीत महाडला येणाऱ्या पुराची पातळी कमी करता येईल हे पटवून दिले.

  संजय परांजपे यांनी भराव काढणे या कमी कालावधीतील उपाय योजनां सह सावित्री नदी पात्रातील गाळ उपसणे, जुटे काढणे, महामार्गाचा भराव व अपूर्ण राहीलेली धरणांची कामे या दिर्घ कार्लीन उपाय योजनांचाही पाठपुरावा करण्यात येईल असे स्पष्ट केले. प्रकाश पोळ यांनी दासगांव येथील पाणथळीच्या जागेवरील भराव काढल्यास महाडकरांना पुरापासून ८० टक्के दिलासा मिळेल तर धरणे बांधणे, रेती उपसा, जुटे काढणे, महामार्गावरील भरावातून पाण्याचा निचरा व्हावा यासाठी आणखी मोऱ्या भुयारी मार्ग बनवणे या उपाय योजनांमुळे २० टक्के दिलासा मिळणार आहे हे पटवून दिले.

  नितिन पावले यांनी दासगांव येथील पुलाच्या बाजुस राहणाऱ्या रहिवाशांकडून यावर्षी अलेल्या पुराच्या पाण्याचा वेग आणि १९८९ व २००५ मध्ये आलेल्या पुराची तुलना दाखवून अशीच परिस्थिती राहीली तर बंदर परिसरात असणारी घरे पाण्याच्या वेगात वाहून जातील अशी भिती व्यक्त करून त्यास दासगांव येथील रहिवाशी जयेश अनंत मिंडे यांनी दुजोरा दिला. शासनस्तरावर या उपाययोजना तातडीने व्हाव्यात यासाठी महाडकरांनी एकत्र येऊन महाड पुर निवारण समितीच्या नेतृत्वा खाली आंदोलन पुकारावे लागेल असेही यावेळी सांगण्यात आले.