Kurla Ghat Uprooted trees will be conserved
कुर्ला घाटात (Kurla Ghat) उन्मळून पडलेल्या वृक्षांचे होणार संवर्धन

  • वडघर येथील गिधाड संवर्धन केंद्रात या झाडांना मिळणार नव संजीवनी
  • सिस्केपचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग ठरणार

महाड : महाड (mahad) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी (heavy rain fall) मध्ये कुर्ला परिसरातील घाटात (kurla ghat) मोठ्या प्रमाणात दरड कोसळून (land slide) डोंगरात असणारी झाडे उन्मळून पडली होती पाऊस कमी झाल्यानंतर सिस्केप (Siskep) संस्थेच्या सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग (pwd) व वन विभागाच्या (forest department) मदतीने या झाडांचे संवर्धन ( tree conservation) करण्याचे ठरवले असून वडघर (vadghar) येथील गिधाड संवर्धन केंद्रात या झाडांची पुन्हा लागवड करून त्यांना नव संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सिस्केप कडून सुरु असणारा हा प्रयोग जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

महाड तालुक्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत कुर्ला घाटातील डोंगरावरील माती घसारा खाली येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडलेल्या अवस्थेत मरण यातना सहन करत होते. ही बाब सिस्केप सदस्यांनी लक्षात घेऊन या झाडांचे संवर्धन करण्याचे ठरवले. गेल्या दोन आठवड्यात पाऊस कमी झाला आणि सिस्केपच्या योगेश गुरव ,चिराग मेहता, ओंकार सावंत, सोहम धारप , प्रतीक देसाई, चिराग बाईत , प्रणव कुलकर्णी , श्रीकांत सुतार या टीमने या झाडांना आज सकाळी धिगाऱ्यातून कढायला सुरुवात केली. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाड वन विभागाने परवानगी देऊन मोलाचे सहकार्य केले.

यामध्ये १५ वर्षाचं पिंपळाचे झाड , आसना , बीवळा , अर्जुन आणि बरतोंडी तसेच जंगली २४ झाडांना वाचविण्याचे यशस्वी प्रयत्न आज सिस्केपने केले. ही झाडे वडघर या गोरेगाव येथील गावात शैलेश देशमुख यांच्या येथे गिधाड अभ्यास संशोधन आणि संवर्धन केंद्र येथे लावण्यात येणार असून हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग असणार आहे. वादळात वडघर गिधाड संवर्धन प्रकल्प जंगलाची खूप हानी झाली आणि आता पुन्हा छोटे रोप लावून जंगल देवराई पुर्नजीवित करण्याचे काम सुरू केले आहे पण ही एक/ दोन वर्षे वयाची झाडे वाढवायास वेळ लागणार आहे.

पण हेच पहाता सध्या दरडी कोसळण्याच्या घटना आणि त्यामधे अनेक झाडे मरत असल्याचे लक्षात घेऊन या झाडांना वाचविता आले तर दोन्ही गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे झाड वाचेल आणि दुसरं १० – २० वर्षाची झाडे साहजिकच पटकन मोठी होतील आणि पक्षांना निवारा म्हणून सिद्ध होतील असे मत सोहम धारप प्रतीक आणि ओंकार यांनी मांडले.

आज खरतर बिष्णोई समाजाने झाडांना मिठी मारून त्याचे प्राण वाचविले. हे आंदोलन चीपको आंदोलन म्हणून जगप्रसिद्ध झाले. याच दिवसाचे औचित्य साधून सिस्केपच्या सदस्यांनी झाडे वाचविण्याच्या या मोहिमेला सुरुवात केली आहे. समाजातून या सर्व तरुणांचे कॉलेज युवकांचे कौतुक होत आहे. आपणही यात सहभागी होऊ शकता. आपल्याला असे काम करायचे असेल किंवा या कामातील कोणतीही जबाबदारी उचलायची असेल तर आपण योगेश गुरव ८८८८२३२३८३ , सागर मेस्त्री ९६५७८६४२९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सिस्केप संस्थेकडून करण्यात आले आहे.