Mumbai–Pune Expressway

हा गॅस टँकर पुण्याहून मुबंई कडे निघाला होता. यावेळी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडोशी बोगद्यातजवळ या टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली. 

    खोपोली : मुबंई-पुणे महामार्गावर गॅस टँकरला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. मात्र, पोलिस आणि बचाव पथक तात्काळ घटना स्थळी दाखल झाल्याने तात्काळ गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

    हा गॅस टँकर पुण्याहून मुबंई कडे निघाला होता. यावेळी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडोशी बोगद्यातजवळ या टँकरला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. यामुळे टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरु झाली.

    या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आणि अपघात ग्रस्त टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गॅस एक्सपर्टच्या मदतीने गॅस गळती पूर्णतः बंद करण्यात आली. तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र खबरदारी म्हणून काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती.

    एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

    - संजय राऊत, खासदार, शिवसेना