Atal kandak

सातव्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’(atal karandak) एकांकिका स्पर्धेच्या (one act play competition)अंतिम फेरीला २९ जानेवारीपासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे.

पनवेल: रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या राज्यस्तरीय ‘अटल करंडक’(atal karandak) एकांकिका स्पर्धेच्या (one act play competition)अंतिम फेरीला २९ जानेवारीपासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे.

पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणाऱ्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन सकाळी ०९ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर हे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून नाटककार, साहित्यिक आणि ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी हे उपस्थित राहणार आहेत.

यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेलचे प्रदेक्षाध्यक्ष ऍड. शैलेश गोजमगुंडे, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, प्रसिद्ध सिने अभिनेते जयंत वाडकर, लेखक, दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या एकांकिका स्पर्धेचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व सभागृहनेता परेश ठाकूर, स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बऱ्हाटे, स्पर्धा सचिव व प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे यांनी केले आहे.

महाअंतिम फेरीसाठी निवड झालेल्या २४ एकांकिका : दुसरा आईन्स्टाईन ( नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरीवली), यंदा कर्तव्य आहे (के. इ. एस कॉजेज, मुंबई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाईट लाईट, ठाणे), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), १२ कि.मी. (ए.एस.एम. प्रोडक्शन, मुंबई), लव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीप (आमचे आम्ही, पुणे), क्लिक (ओम साई कलामंच, वसई), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली), आर ओके (सी. के. टी. कॉलेज, पनवेल), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), गुंतता (निर्मिती, वसई), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), बेड टाईम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बी.एम.सी.सी., पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे).

पारितोषिकांचे स्वरुप
प्रथम क्रमांक- ०१ लाख रूपये, आणि मानाचा अटल करंडक
द्वितीय क्रमांक- ५० हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक- २५ हजार रूपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक- १० हजार रूपये, उत्तेजनार्थ क्रमांक ०५ हजार रुपये
प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक/अभिनेता/अभिनेञी/लेखक/संगीत/नेपथ्य/प्रकाश योजना/ उतेजनार्थ असे विविध पारितोषिके.