श्रीवर्धन परिवहन आगारातून सुरू होणार लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या

  • श्रीवर्धन आगाराने आता लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत मात्र एका बस मध्ये फक्त बावीस प्रवाशांना प्रवास करता येणार आहे शासनाकडून ज्याप्रमाणे आदेश देतील त्यानुसार तेरा वाढविल्या जातील तसेच गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्या देखील सोडण्यात येणार आहेत

श्रीवर्धन : श्रीवर्धन परिवहन आगारातून लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू व्हाव्यात अशी मागणी गेले अनेक दिवस प्रवाशांमधून होत होती. संपूर्ण देशामध्ये आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. श्रीवर्धन शहरात सर्व आजारांवरती वैद्यकीय उपचार होत नसल्याने अनेकांना मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागते. अशा उपचार घेणाऱ्या अनेक नागरिकांची एसटी सेवा बंद असल्यामुळे गैरसोय होत होती. श्रीवर्धन परिवहन आगाराने याअगोदरच श्रीवर्धन बोरली पनवेल व श्रीवर्धन पनवेल या दोन फेऱ्या सकाळच्या वेळात सुरू केल्या होत्या. 

तर परतीच्या प्रवासासाठी पनवेल बोरली श्रीवर्धन ही बसफेरी दुपारी एक वाजता पनवेल येथून सुटते. तर श्रीवर्धन साठी येणारी पनवेल श्रीवर्धन बस दुपारी अडीच वाजता पनवेल येथून सुटते. मात्र श्रीवर्धन आगाराने आता गणेशोत्सव तोंडावर येत असल्याने काही लांब पल्ल्याच्या अजून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यामध्ये श्रीवर्धन बोरली नालासोपारा, श्रीवर्धन बोरली भांडुप, तर श्रीवर्धन नानवली मुंबई या बस फेऱ्या उद्यापासून सुरू होणार असून या बस श्रीवर्धन येथून सकाळी सुटून रात्री साडेनऊ वाजता नालासोपारा, भांडुप व मुंबई येथून श्रीवर्धन करता सुटणार आहेत. तसेच श्रीवर्धन आगाराने श्रीवर्धन पुणे ही सुद्धा बस सेवा सुरु करण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे.

श्रीवर्धन आगाराने आता लांब पल्ल्याच्या  फेऱ्या सुरू केल्या आहेत मात्र एका बस मध्ये फक्त बावीस प्रवाशांना प्रवास करता येणार आहे शासनाकडून ज्याप्रमाणे आदेश देतील त्यानुसार तेरा वाढविल्या जातील तसेच गणेशोत्सवासाठी जादा फेऱ्या देखील सोडण्यात येणार आहेत – श्रीवर्धन परिवहन आगार व्यवस्थापक – श्री जुनेदि