महाड इमारत दुर्घटना: ४ वर्षाच्या बालकाला जिवंत बाहेर काढण्यात यश

कोसळलेल्या इमारतीचा मलबा काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर फारूख काझी यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि इंजिनिअर यांचा समावेश आहे.

रोहन शिंदे, महाड : काल सांयकाळी शहरातील काजळपूरा खारखांड मोहल्ला येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४१ फ्लॅटमधील ९७ रहिवाशांपैकी ७८ रहिवाशी सुखरूप बाहेर पडले तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १९ पैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे तब्बल १९ तासांनंतर ४ वर्षाच्या बालकाला मलब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

कोसळलेल्या इमारतीचा मलबा काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर फारूख काझी यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नगर पालिकेचे मुख्याधिकारी आणि इंजिनिअर यांचा समावेश आहे. काल सांयकाळी ६. १५ वाजता सदर इमारत पत्यासारखी कोसळल्यानंतर रात्रीच बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली होती.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाकडून युद्ध पातळीवर शोधकार्य सुरु होते. आज दुपारी १ वाजेपर्यंत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या मलम्याखाली १७ रहिवाशी अडकले असल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.