महाड शासकीय ग्रामीण रुग्णालयातील परिचारिका झाली कोरोनामुक्त

अलिबाग: सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना रायगड जिल्ह्यातील महाड शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये एका कोरोनाग्रस्त परिचारिकेवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. महाडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार

अलिबाग: सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव होत असताना रायगड जिल्ह्यातील महाड शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये एका कोरोनाग्रस्त परिचारिकेवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. महाडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करुन तिचा कोराेना चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर या परिचारिकेला आज घरी पाठविण्यात आले.  महाड प्रेस असोसिएशन आणि ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी, ओवाळणी करीत या परिचारिकेचे अभिनंदन करण्यात आले.महाडमधील कोकरे गावात आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णाशी उपचारादरम्यान या परिचारिकेचा संपर्क आला होता. दरम्यान तिचेहीे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. उपचाराकरिता मुंबईला पाठवण्याऐवजी तिच्यावर महाडमध्येच उपचार करण्याचा निर्णय महाडच्या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी घेतला आणि तिला कोरोनामुक्त करण्यात यश मिळविले. छोट्या शहरांमधून, गावांमधून करोनावर उपचारासाठी रूग्ण माेठ्या शहरांमध्ये नेले जात असताना ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेवून बऱ्या झालेल्या या रुग्णाची ही घटना सर्वांनाच दिलासादायक, प्रेरणादायी आहे.