महाड बाजारपेठेतील कापड दुकानाला आग, मालाचे लाखोंचे नुकसान

महाड: महाड बाजारपेठेतील चामुंडा एन एक्स या कापड दुकानाला आज पहाटे दिड वाजण्याच्या सुमारला भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह इमारत पूर्ण जळून खाक झाली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले

 महाड: महाड बाजारपेठेतील चामुंडा एन एक्स या कापड दुकानाला आज पहाटे दिड वाजण्याच्या सुमारला भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह इमारत पूर्ण जळून खाक झाली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन नगरपरिषद, महाड औद्योगिक वसाहत अग्निशामक पथकाने दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणामध्ये आणली. मात्र आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही. 

महाड शहरातील महात्मा गांधी मार्गावर प्रमुख बाजारपेठत याच दाट लोक वस्तीच्या परिसरांमध्ये चामुंडा एनएक्स नावाचे कापड दुकान आहे. लॉकडाऊन असल्याने गेल्या दोन महिन्यांपासुन दुकान बंद ठेवण्यात आले होते. रात्री एक वाजण्याच्या सुमाराला दुकानाच्या प्रमुख दरवाज्यांतुन धुर येण्यास सुरवात झाली. थोड्याच वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. या दुकानाला लागुन अन्य दुकाने असुन बहूतांशी दुकानांच्या इमारती जुन्या आणि लाकडाचा वापर अधिक करण्यात आलेल्या असल्याने या दुकानांना आगीची झळ पोहोचल्यास संपुर्ण बाजारपेठ आगीच्या भक्षस्थानी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. रात्री दिड वाजण्याच्या सुमारला महाड एमआयडीसी आणि नगरपरिषदेचे अग्निशामक पथक घटना स्थळी रवाना झाल्या नंतर दोन तासांच्या अथक प्रयत्नांतुन आग नियंत्रणामध्ये आणण्यात यश आले.आग विझविण्यासाठी दोन खाजगी टँकरचे मोलाचे सहकार्य झाले.त्याच बरोबर स्थानिक नागरिकांनीदेखील आग विझविण्याच्या कामात मदत केली. आगीमुळे दुकानांमधील सर्व कापडी माल जळून खाक झाला असुन या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यांत आले.