महाड तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, उत्पादक संघटनेच्या प्रयत्नांना यश

कोरोना संसर्ग झालेले रुग्ण वैद्यकिय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या उपचारानंतर बरे होत आहेत. या महामारीतून बरे होण्याचे प्रमाण आता वाढून ही साथ आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी व नंतर ज्या प्रमाणात रायगड जिल्ह्यासह कोकणात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत होते त्या तुलनेत आता नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असता ना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दक्षिण रायगड मधील महाड तालुका आता झपाटयाने कोरोना मुक्तीकडे वाटचाल करित असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. मात्र अस असतांना सर्वांनी गाफील सुद्धा राहुन चालणार नाही.

महाड : भारतात कोरोनाच्या विषाणूंनी (Corona Virus) मार्च मध्ये प्रवेश केला. कोरोना संसर्ग महामारीला आता सात महिने पूर्ण होत आहेत. चिन ( ड्रॅगन ) न अख्या जगाला या महामारी रोगाच्या गर्तेत ढकलले. आज या रोगावर लस तयार होऊ शकलेली नाही कधी तयार होईल तेही निश्चित सांगता येत नाही.परंतु सुरुवातीस कोरोनाची जी दहशत साऱ्या जगात होती ती या साथीवर कोणतेही औषध अथवा लस तयार झालेली नसताना ही आता राहीली नाही. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण वैद्यकिय यंत्रणांकडून केल्या जाणाऱ्या उपचारानंतर बरे होत आहेत. या महामारीतून बरे होण्याचे प्रमाण आता वाढून ही साथ आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी व नंतर ज्या प्रमाणात रायगड जिल्ह्यासह कोकणात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत होते त्या तुलनेत आता नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असता ना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दक्षिण रायगड मधील महाड तालुका आता झपाटयाने कोरोना मुक्तीकडे वाटचाल करित असल्याचे वास्तव चित्र पहावयास मिळत आहे. मात्र अस असतांना सर्वांनी गाफील सुद्धा राहुन चालणार नाही.

साधारण भारतात कोरोना महामारी रोगा विरोधात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडकडीत लॉकडाऊन करण्यात आला. सुरुवातीचे अडीच ते तीन महिने सर्वांनी तो पाळला. मात्र दिर्घ लॉकडाऊन देशाला राज्याला परवडणारा नव्हता यामुळे चौथ्या महिन्या पासून लॉक डाऊन शिथिल करीत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या होत्या त्यानंतर अनलॉक डाऊनचे १ ते ४ टप्पे करण्यात आले होते. यादरम्यान मुंबई – पुण्याच्या हद्दींना लागून असणा-या रायगड जिल्हयाच्या उरण, पेण, अलिबाग, पनवेल, नवी मुंबई, कर्जत, खालापूर खोपोली या भागांत लॉक डाऊन काळातच कोरोनानी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती तो पर्यंत दक्षिण रायगडचा भाग असणार्याल पोलादपूर, महाड माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा रोहा आदी तालुक्यांत कोरोना म्हणावा तसा पसरला नव्हता. मात्र या भागांना ट्रॅव्हल हिस्ट्री आणि चाकरमान्यांच्या गावाकडील स्थलांतराचा मोठा फटका बसला आणि बघता बघता दक्षिण रायगड ही कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. रायगड जिल्हयाला फार मोठी औद्योगिक वसाहत लाभली आहे.

लॉकडाऊन दरम्यान जिल्हयातील शंभर टक्के कारखाने सुरु ठेवण्यात आले होते. सुरुवातीच्या काळांत औद्योगिक वसाहती मध्ये कामगारांत कोरोनाची लागण झाली नव्हती यामुळे कामगार रोजी रोटी पासून वंचित राहिला नव्हता. मात्र कालांतराने महाड औद्योगिक वसाहत त्यांच्या कॉलन्या नंतर रोहा, माणगाव, खालापूर खोपोली आदी औद्योगिक वसाहती मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता तरीही प्रशासनानी कारखानदारांनी कामगार आणि त्यांच्या कुंटूबियांच्या देखभालीच्या नियमाखाली बिनधास्त कारखाने सुरु ठेवले होते. कोरोनाचा फैलाव महाड तालुक्यात वाढतच होता आता पर्यंत १७०० ते १८०० दरम्यान कोरोना रुग्ण संख्या झाली होती. त्यामध्ये सुरुवातीच्या काळांत अनेक रुग्ण या महामारी रोगाला आपली विल पॉवर गमावत दगावत गेले. यामध्ये शहर आणि तालुक्यांनी अनेक दिग्गज व्यापारी, वकील, राजकारणी, पत्रकार, समाज सेवक असे आता पर्यंत ७४ जणांना या कोरोनाचा शिकार व्हाव लागले आहे.

आज मात्र महाड तालुक्याच चित्र बदलत आहे. कोरोना मुक्तीकडे झपाट्याने मार्गक्रम करतांना आशावादी चित्र पहावयास मिलत आहे. या महामारीनी एवढा कहर केला होता की तालुक्यांतील ७० टकके वैद्यकीय व्यावसायीकच कोरोनाच्या लपेटात आले होते तर शासकीय पातळीवर मात्र उपचार प्रणाली सामाजिक संघटनाचे कार्य तर महाड औद्योगिक वसाहतीच्या एम. एम. ए. सि. ई. टी. पी. नी पुन्हा एकदा सामाजिक मानवतावादी धोरण स्विकारत केएसएफ कॉलनीत सुरु केलेल अद्ययावत कोविड सेंटर महाडकरांना दिलासा देवून गेल आहे. महाड तालुक्यात ज्या वेगाने कोरोना रुग्ण वाढत होते ते पाहता या रुग्णांवर उपचार करणे म्हणजे एक मोठे आव्हान होते. मात्र सुरुवातीच्या काळात महाड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ भास्कर जगताप यांनी हे आव्हान आपल्याकडे असणाऱ्या साधन सामुग्री त्याच प्रमाणे सामाजिक संस्थांकडून देण्यात आलेल्या मदतीच्या जोरावर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले त्यामुळे मुंबई पनवेल येथे उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णाना दिलासा मिळाला.

त्या पाठोपाठ महाड उत्पादक संघटनेने देवा ड्रील कंपनी च्या साहाय्याने केएस एफ कॉलनी येथे डेडिकेटेड कोव्हीड केअर सेंटर सुरु करून महाड पोलादपूर माणगांव तालुक्यातील रुणांना दिलासा दिला. आत्तापर्यंत महाड ग्रामीण रुग्णालय व पोलिस वसाहती मधील कोव्हीड सेंटर मधून ७०० ते ८०० तर एम एम ए कोव्हीड सेटर मधून ७०० ते ८०० रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. महाड तालुका झपाट्याने कोरोना मुक्तीकडे मार्गक्रम करत आहे. त्यामध्ये महाड ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ .भास्कर जगताप, प्रसिद्ध डॉ. हिम्मतराव बावस्कर, तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. बिराजदार, डॉ. फैजल देशमुख, डॉ. महामणकर यांच्यासह इतर वैद्यकीय व्यावसायिक यांचही फार मोठ योगदान या कोरोना मुक्तीसाठी आहे.

आज महाड नगरपालिका संपूर्ण प्रशासन नगराध्यक्षा स्नेहल जगताप सर्व नगरसेवक विरोधी पक्षनेते यांचेही कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यामध्ये मोलाचा वाटा आहे मात्र पालिका सफाई कामगांरांच्या योगदानासाठी शब्दही तोकडे पडतील पोलिस अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव व्यापारी नागरिक भले हा सर्वांच्या एक जूटीचा विजय असला तरी कोरोनाची जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तो पर्यत धोका कायम असणार आहे. सुरुवातीचा कोरोना रोग स्ट्रॉग होता आज जरी माईल्ड होत चालला असला तरी शहरांतील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, पोष्ट ऑफीस आणि बाजारातील तुफान गर्दी धोकादायक अशीच आहे.अनलॉक मध्ये आता खुल व्हायच फक्त मंदिरे मस्जिदच बाकी आहेत ती ही लवकर खुली होतील पण इतर रोगाप्रमाणे आता कोरोना महामारी रोगानी आपल कायमच अस्तित्व निर्माण केल आहे एवढ निश्चित म्हणाव लागेल.