महाड तालुका दरडींच्या रडारवर : सावित्री, गांधारी, काळ नद्यानी उलटली धोक्याची पातळी

गुरुवारी पहाटे पासून पावसानी रोद्ररूप धारण करता बघता बघता सावित्री, गांधारी, काळ नद्या अचानक दुथडी भरुन वाहू लागल्या परिणामी शहरांतील दस्तुरी नाका, रायगड रोड, रावढळ बिरवाडी आदी भागांत पुराचे पाणी शिरल्याने त्याच बरोबर सावित्री नदिचे पाणी मुख्य बाजार पेठ आदी भागांत प्रवेश करू लागता व्यापारी आणि नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली आहे.

    महाड – गेली ४ दिवस तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी अचानक पणे वाढल्याने २५ व २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तर दिर्घ कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण तालुका दरडीच्या रडारवर लटकत आहे.

    दरम्यान अतिवृष्टीमुळे तालुक्यांतून वाहणाऱ्या सावित्री, काळ, गांधारी आणि नागेश्वरी नद्यानी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहराला महापुराचा धोका निर्माण झाला आहे तर तालुक्यात बरसत असणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून दळणवळ विस्कळीत झाल आहे.

    गुरुवारी पहाटे पासून पावसानी रोद्ररूप धारण करता बघता बघता सावित्री, गांधारी, काळ नद्या अचानक दुथडी भरुन वाहू लागल्या परिणामी शहरांतील दस्तुरी नाका, रायगड रोड, रावढळ बिरवाडी आदी भागांत पुराचे पाणी शिरल्याने त्याच बरोबर सावित्री नदिचे पाणी मुख्य बाजार पेठ आदी भागांत प्रवेश करू लागता व्यापारी आणि नागरिकांची एकच त्रेधातिरपीट उडाली आहे.

    तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी घरांची आणि गुरांच्या गोठ्याच्या पडझडीच्या घटना घडतांना एक बैलही ठार झाला आहे तर किल्ले रायगड येथील रायगडवाडी येथे दरड कोसळली आहे पावसाचा असाच जोर वाढल्यास मागील दुर्घटनांची पुनरावृत्ती नाकारता येत नाही.

    संपूर्ण कोकणात प्रतिवर्षी पावसाळ्यात महाड तालुका अतिवृष्टी महापूर आणि दरडी कोसळणे यासाठी अति संवेदनशिल तालुका मानला जातो. येथे जिवीत व वित्तहाणी फार मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून येथील शासनाची सर्वतर्हेची आपदकालीन यंत्रणा सज्य ठेवण्यात येते. २५ व २६ जुलै २००५ सालच्या नैसर्गिक आपत्तीचा प्रलय आजही अंगावर शहारे आणनारा असाच ठरला आहे.