I did not say I will hit you under the ear; Even after his arrest, Narayan Rane's role regarding Chief Minister Uddhav Thackeray remained the same

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करणार आहेत. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्व कार्यवाही होणार आहे. या नंतर राणेंना महाड कोर्टात हजर केले जाणार असल्याचे समजते. एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात राणे समर्थकांची मोठी गर्दी झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    महाड : केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर करणार आहेत. मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात सर्व कार्यवाही होणार आहे. या नंतर राणेंना महाड कोर्टात हजर केले जाणार असल्याचे समजते. एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात राणे समर्थकांची मोठी गर्दी झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देतांना उद्धव ठाकरें (Chief Minister Uddhav Thackeray )संदर्भात त्यांना जे करायचे आहे ते करू द्या मला जे करायचे आहे ते मी करेन, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत एकेरी उल्लेख केला. ते कायम थोडी मुख्यमंत्री राहणार आहेत, अशाप्रकारे ते कायद्याचा गैरवापर करणार असतील तर आम्ही सुद्धा राजाकरणामध्ये आहोत, असे सूचक वक्तव्य राणेंनी केले आहे. यावेळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.

    माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे हालचाली

    अटक झाली तेव्हा नक्की काय घडले याबद्दल राणेंनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले कि, गोळवली येथील गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प येथे मी दुपारी सव्वा ३ वाजेच्या सुमारास जेवत असतानाच अचानक तिथे डिसीपी आले आणि तुम्हाला अटक करण्यात येत आहे असे मला सांगितले. मी त्यांना नोटीस दाखवा असे म्हटले तर त्यांच्याकडे नोटीस वगैरे नव्हती. त्यांनी जबरदस्तीने मला अटक करुन संगमेश्वर पोलीस स्थानकामध्ये आणले. त्यानंतर ते एका रुममध्ये गेले आणि दोन तास बाहेर आले नाहीत. मला त्यांचा हेतू चांगला वाटला नाही. माझ्या जीवाला धोका असल्याप्रमाणे त्यांच्या हालचाली होत्या. नंतर तिथे अनेक अधिकारी आले. आता कोकणातील महाड येथे नेत आहे, असे राणे म्हणाले.

    मी कानाखाली मारेल म्हणालो नाही

    यावेळी राणे यांना आपल्या वक्तव्याबाबत चूक झाली असे वाटते का असे विचारले असता ते म्हणाले की, मी कानाखाली मारेल म्हणालो नाही, हा कितवा स्वातंत्रयदिवस आहे हे देखील मुख्यमंत्र्याना माहिती नाही, त्यांना सचिवांनी सांगावे लागते हे चूक आहे त्यानी माहिती घेवून यायला हवे होते असे मत मी मांडले होते त्यावेळी मी असतो तर कानाखाली मारली असती असे म्हणालो असा खुलासा करत त्यांनी विधानाचे समर्थन केले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]