Mahadkar fell asleep Five burglaries in one night
महाडकरांची झोप उडाली; एकाच रात्रीत पाच घरफोड्या

ओक बंगल्यात मध्यरात्री कुणी शिरत असल्याची चाहूल या बंगल्याची देखभाल करणाऱ्या राजेश शिगटे यांना लागल्यानंतर ते पत्नीसह आपल्या घराबाहेर आले. त्यावेळेस निळा टी शर्ट घातलेला एक इसम रस्त्याने संशयास्पद जाताना त्यांना दिसला. घराबाहेर एक तोडलेले कुलुपही आढळून आले. शिंगटे यांनी त्वरीत महाड शहर पोलिसांना पाचारण केले.

महाड : एकाच रात्रीत महाड शहरातील पाच बंद घरे फोडण्याचा प्रकार आज निदर्शनास आला. सुदैवाने या घरांमधून चोरट्यांच्या हातात काहीही लागले नाही. मात्र आता चोरट्यांचा उपद्रव सुरु होईल या भीतीने महाडकरांची झोप मात्र उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चवदार तळ येथील ओक बंगला आणि गवळ आळी भागातील मीना सातारकर, जयंत शंकर पाटील, निखिल पाटील आणि सुहासिनी गुप्ते घरे चोरट्यांनी फोडली. ही सर्व घरे बंद होती.

ओक बंगल्यात मध्यरात्री कुणी शिरत असल्याची चाहूल या बंगल्याची देखभाल करणाऱ्या राजेश शिगटे यांना लागल्यानंतर ते पत्नीसह आपल्या घराबाहेर आले. त्यावेळेस निळा टी शर्ट घातलेला एक इसम रस्त्याने संशयास्पद जाताना त्यांना दिसला. घराबाहेर एक तोडलेले कुलुपही आढळून आले. शिंगटे यांनी त्वरीत महाड शहर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली असता घरा बाहेर एक टिकाव आणि घरातील पाच खोल्यांची कुलपे तोडण्यात आल्याचे आढळून आले.

आज सकाळी गवळ आळी भागातील चार बंद घरे फोडण्यात आल्याचा प्रकारही उघडकीस आला. त्यापैकी जयंत पाटील यांच्या घरातील पत्र्याच्या पेटीवर चोरट्यांच्या हाताचे ठसे आढळून आले आहेत. ज्यांची घरे फोडण्यात आली आहेत ते सर्व बाहेर गावी गेले आहेत. त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असता आमच्या घरांमध्ये कोणत्याही मौल्यवान चीजवस्तू नसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक फौजदार श्री. कापडेकर यांनी घटना स्थळांची पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.