“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

हे आक्रीत घडलेले आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाडच्या तळीये गावात जाऊन दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेत दगावलेल्या लोकांच्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांचं सांत्वन केलं. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी पुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करण्यात येणार असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.

    दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्याचे प्रमाण आणि परिणाम आपण ठरवू शकत नाही. कुणीही ढगफुटीचा अंदाज वर्तवू शकत नाही. कोल्हापूर आणि सांगलीत प्रचंड पूर आला. धरणाचे गेट सोडण्यात येणार होते. त्यामुळे परिस्थिती नाजूक झाली होती. कोकणातही जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे आम्ही वॉटर मॅनेजमेंट करणार आहोत. जल आराखडा तायर करणार आहोत. अचानक पुराचं पाणी वाढतं आणि होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळेच हा जल आराखडा तयार करणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

    हे आक्रीत घडलेले आहे. आजकाल पावसाळ्याची सुरुवात सुद्धा चक्रीवादळाने होते. तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू. असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

    ही आपत्ती इतकी मोठी होती की मदतीला त्याठिकाणी पोहताना जवानांना आणि पथकाला अडचणी आल्या. कारण सगळ्या सामुग्रीनिशी त्यांना बचाव कार्य करायचे होते. असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.