भाजप युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा चिटणीसपदी महेश निकम यांची निवड

पोलादपूर : भारतीय जनता पार्टीच्या(bhartiya janata party) युवा मोर्चाच्या नियुक्ती मंगळवारी झाल्या असून युवा नेते महेश निकम यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या दक्षिण रायगड(south raigad) जिल्हा चिटणीसपदी निवड झाली. तसेच पोलादपूर युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी विकास लाड, शहराध्यक्षपदी जयेश जगताप यांची निवड झाली.

यावेळी भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग,संपर्कप्रमुख बंडू खंडागळे, सोशल मीडियाच्या श्वेता ताडफळे, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, तालुका चिटणीस समीर सुतार, राजू धुमाळ, राजाभाऊ दीक्षित, नितीन घोसाळकर, गणेश गोळे, भाई जगताप, समाधान शेठ, सचिन बुटाला, मनोज मोरे, मुन्ना जाधव, पद्माकर मोरे, पालपिंनकर, कोतवालचे सरपंच गणेश कदम उपस्थित होते.