महाड महापुरात 200 हुन अधिक नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महेश सानप यांचा सत्कार

पुरामुळे संपूर्ण महाडला पाण्याचा वेढा होता. पाणी शहरात शिरल्याने बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. संपर्क यंत्रणा कोलमडल्या व वीज पुरवठा देखील बंद झाला होता. घरात अडकलेल्या लोकांना भर पाऊसात घरांच्या छतावर बसण्याची वेळ आली होती. एनडीआरएफचे पथक मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने अडकून राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत जीवाची पर्वा न बाळगता कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचरची टीम बाचावकार्य करत होती. 

    महाड येथे आलेल्या महापुरात जिव धोक्यात घालून 200 हुन अधिक नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या महेश सानप यांचा खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महेश सानप व रेस्क्यू टीमचे धाडसी साहसी कार्य अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार सुनिल तटकरे यांनी काढले.

    महेश सानप व त्यांच्या टीमने स्वतःचा जिव धोक्यात घालून अनेकांना जीवदान देण्याचे महान कार्य केले. महापुरात मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी महेश सानप व टीमने देवदूत  बनून काम केले.   महेश सानप यांच्या वाईल्डर वेस्ट अँडव्हेंचर या टीमने महाड येथे दि.२२ जुलै रोजी आलेल्या पुराच्या पाण्यातून २०० जणांचे प्राण वाचवून बचावकार्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.

    निसर्गाचा प्रकोप होऊन  महापूर आला होता. या पुरामुळे संपूर्ण महाडला पाण्याचा वेढा होता. पाणी शहरात शिरल्याने बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. संपर्क यंत्रणा कोलमडल्या व वीज पुरवठा देखील बंद झाला होता. येथील परिस्थिती अधिकच बिघडत गेली होती. घरात अडकलेल्या लोकांना भर पाऊसात घरांच्या छतावर बसण्याची वेळ आली होती. मदतीचे सर्व मार्ग बंद झाले होते तर एनडीआरएफचे पथक मुंबई गोवा महामार्गावर पाणी असल्याने अडकून राहिले होते. अशा कठीण परिस्थितीत जीवाची पर्वा न बाळगता कोलाड येथील वाईल्डरवेस्ट अँडव्हेंचरची टीम बाचावकार्य करत होती.