निसर्ग चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान

सुतारवाडी - यावर्षी आंब्याचे पीक बऱ्यापैकी आले होते. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील आंबा हवा तसा शहरांमध्ये विक्रीसाठी पोहोचला नाही. कोरोनामुळे ठराविक व्यक्ती घराबाहेर पडत होत्या. मनसोक्तपणे

 सुतारवाडी – यावर्षी आंब्याचे पीक बऱ्यापैकी आले होते. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील आंबा हवा तसा शहरांमध्ये विक्रीसाठी पोहोचला नाही. कोरोनामुळे ठराविक व्यक्ती घराबाहेर पडत होत्या. मनसोक्तपणे आंब्याची खरेदी होत नव्हती. कोरोना शी  मुकाबला करत असताना ३ जून २०२० रोजी निसर्ग चक्रीवादळ आले आणि अनेकांना बेघर  केले. सुतारवाडी,  धगडवाडी,  सावरवाडी,  कुडली, आंबिवली, पहूर,  नारायणगाव,  कामत याठिकाणी फार्महाउस आहेत. या फार्महाऊसवर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंब्याची झाडे आहेत.

आंबे ही मोठ्या प्रमाणावर दरवर्षी उपलब्ध होतात. बाहेरील व्यापारी अगोदरच आंब्याची झाडे खरेदी करून आंबे आले की वाशी,  मुंबई,  ठाणे, पुणे या शहरात विक्रीसाठी नेत असतो. या फार्म हाऊस मधील अनेक झाडे निसर्गाने जमीनदोस्त केल्या मुळे आता पुढील वर्षी आंब्याची चव चाखायला मिळणार की नाही हे सांगता येणार नाही. या चक्रीवादळामुळे आंबे,  फणस, तसेच इतर उत्पन्न देणारी झाडे जमीनदोस्त झाल्या मुळे फार्म हाऊस मालकांना सुद्धा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

एकतर कोरोनामुळे लॉक डाऊन होता. त्यामुळे मार्च,  एप्रिल,  मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर येणारे पर्यटक फिरकलेच नसल्यामुळे मोठी मंदीची लाट पसरली होती. कोरोना संकट चालू असताना ३ जूनला  चक्रीवादळाने आंब्याच्या झाडांवर संक्रांत आणली. आता नवीन लागवड करून रोप कधी मोठी होणार आणि वृक्षात रूपांतर होऊन आंबे कधी लागणार असे कुडली येथील लक्ष्मीबाई फार्मचे सदस्य राजेंद्र वाचकवडे यांनी आपले मत व्यक्त केले. ज्या- ज्या आंबा बगायतदारांचे नुकसान झालेले आहे तसेच चक्रीवादळाने अनेकांना बेघर केले आहे अशांचे योग्य ते पंचनामे होऊन शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामीण भागात जोरधरत आहे.