व्यवस्थापनाची स्थानिक वाहतूकदारांच्या प्रश्नांवर चर्चेस टाळाटाळ, मनसेची जेट्टीवर धडक

रविंद्र कान्हेकर (Ravindra Kanhekar) तालुक्यातील सानेगाव (Sanegaon)  येथील इंडो एनर्जी जेट्टी (Indo Energy Jetty) व्यवस्थापनाकडून स्थानिक वाहतुकदारांची नेहमीच गळचेपी करण्यात येते.जेट्टी व्यवस्थापना कडून नेहमीच सर्वच बाबतीत स्थानिक वाहतुकदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याने आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी मनसे वाहतूक सेनेच्या झेंड्याखाली हे सर्व वाहतुकदार एकत्र आले.

रोहा: रविंद्र कान्हेकर (Ravindra Kanhekar) तालुक्यातील सानेगाव (Sanegaon)  येथील इंडो एनर्जी जेट्टी (Indo Energy Jetty) व्यवस्थापनाकडून स्थानिक वाहतुकदारांची नेहमीच गळचेपी करण्यात येते.जेट्टी व्यवस्थापना कडून नेहमीच सर्वच बाबतीत स्थानिक वाहतुकदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याने आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी मनसे वाहतूक सेनेच्या झेंड्याखाली हे सर्व वाहतुकदार एकत्र आले. स्थानिक वाहतुकदारांच्या सर्वच समस्या व प्रश्नांच्या वर चर्चा करण्यास जेट्टी व्यवस्थापनाने वेळ द्यावा असे १ सप्टेंबर रोजी लेखी पत्र देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केली. मात्र त्या पत्राची कोणतीही दखल सानेगाव इंडो एनर्जी जेट्टी व्यवस्थापनाने घेतली नाही. स्थानिक वाहतुकदारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी सतत जेट्टी व्यवस्थापक मंगेश कामथे यांचेशी संपर्क साधत होते. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांचे आदेशानुसार १७ सप्टेंबर रोजी मनसेचे रायगड जिल्हा संपर्क नेते दिलीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, वाहतूक सेना उपाध्यक्ष सुबोध जाधव, उपजिल्हाध्यक्ष अमोल पेणकर यांनी सानेगाव जेट्टी वर धडक देत स्थानिक वाहतुकदारांच्या प्रश्नांवर चर्चा करा असे व्यवस्थापनाला आवाहन केले.त्यानुसार स्थानिक व्यवस्थापक मंगेश कामथे यांनी या प्रश्नांवर माझ्या अखत्यारीत मी कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

मनसे पदाधिकारी व व्यवस्थापक यांच्यात झालेल्या चर्चेत जेट्टी चे वरीष्ठ अधिकारी व मनसेने नेते माजी आमदार बाळा नांदगावकर व वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांच्यात मुंबई येथे आठवडाभरात बैठक घेत त्यामध्ये स्थानिकांच्या समस्यांवर चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे स्थानिक जेट्टी व्यवस्थापन व मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटी दरम्यान ठरले. सानेगाव इंडो एनर्जी जेट्टी वर उतरणाऱ्या कोळसा वाहतूक माध्यमातून आपल्याला रोजगार उपलब्ध होण्यासाठी अनेक स्थानिकांनी कर्ज काढून डंपर घेतले आहेत. मात्र याठीकाणी उपलब्ध होणारा सर्व प्रकारचा रोजगार स्थानिकांना मिळवताना नेहमी संघर्षच करावा लागत आहे.

या ठिकाणी कोळसा वाहतुकीसाठी अनेक स्थानिकांनी आपली कर्जावर घेतलेली वाहने लावली आहेत. मात्र स्थानिक जेट्टी व्यवस्थापन नेहमीच स्थानिक वाहतुकदारांना त्रास देण्यातच धन्यता मानत आली आहे. मालाची वाहतूक करण्यासाठी आलेले वाहनचालकांना योग्य त्या सुविधा न देणे, वजन काट्याचे अतिरीक्त पैसे घेणे, वजन करताना त्यामध्ये पारदर्शकता नसणे, त्यामुळे माल उतरवण्याच्या ठिकाणी कमी माल गेल्यास त्याचा हजार , दोन हजार रुपयांचा भुर्दंड वाहतुकदारांच्या माथी मारणे, एखाद्या वाहतुकदाराने याला विरोध केल्यास त्याची गाडी ब्लॅकलिस्ट ला टाकत महिनाभराहुन अधिक काळ बंद करणे आदी विविध तक्रारी स्थानिक वाहतुकदारांच्या आहेत.

अनेकांनी कर्ज काढून गाड्या घेतल्या असल्यामुळे गाडीजर बेमुदत बंद ठेवल्यास तिचे हप्ते कसे फेडायचे याच विवंचनेत स्थानिक वाहतुकदार असतो. आपल्या सर्व तक्रारी सोडविण्यासाठी स्थानिक वाहतुकदारांनी मनसेच्या वाहतूक सेनेचे सभासदत्व स्विकारले आहे. वाहतुकदारांच्या समस्यांवर चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी बैठक घ्यावी असे लेखी निवेदन व्यवस्थापनाला देण्यात आले होते.मात्र स्थानिक व्यवस्थापक हे चर्चेसाठी चालढकल करत असल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी करत जेट्टीवर धडक दिली. याची दखल घेत आता मुंबई येथे होणाऱ्या वरिष्ठांच्या बैठकीमध्ये आपल्या प्रश्नांवर चर्चा होत न्याय मिळेल असा विश्वास वाहतुकदारांच्या मध्ये निर्माण झाला आहे.