kamgar bharati

आम्हाला न सांगता कामावरून काढले आहेत. आणि आमचा हिशेब आमच्या खात्यात जमा करून कामावरून काढल्याच्या नोटीस कुरियर द्वारे आम्हाला पाठवल्या आहेत. या तुटपुंज्या पैशात आम्ही आमचे घर कसे चालवायचे असा सवाल देखील त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केला आहे.

पेण : पेण तालुक्यातील गडब- कारावी या भागात प्रस्थापित असणाऱ्या प्रिझम जॉन्सन (Johnson) कंपनीतील जवळपास ६७ कामगारांना (workers) कंपनीने घरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या कामगारांनी एकत्र येऊन कामगार भारती या माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या (Management ) माध्यमातून संस्थापक सरचिटणीस हिराजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत कामगारांच्या व्यथा जाणल्या असता त्यांना लॉकडाउन काळात सरकारने कोणत्याही कामगाराला कामावरून काढून टाकता येणार नाही असे सांगून सुद्धा जॉन्सन कंपनीचे मुजोर झाले मॅनेजमेंट त्यातच कोणतीही नोटीस न देता ६७ कामगारांना तडकाफडकी परस्पर हिशोब बँकेत पाठवून त्यांना नोटीस न देता कामावरून काढून टाकले. सदरचा हा निर्णय कामगारांवर अन्याय करणारा असून कामगार भारतीचे सरचिटणीस हिराजी पाटील सर हे आता आम्हा कामगारांना न्याय मिळवून देतील अशी आशा ६७ कामगाराने पत्रकारांसमोर व्यक्त केली. लॉकडाउनच्या काळात मुजोर झालेल्या मॅनेजमेंट कामगारांना एक दमडीही दिली गेली नाही. तीन महिने पगारच दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय आम्हाला न सांगता कामावरून काढले आहेत. आणि आमचा हिशेब आमच्या खात्यात जमा करून कामावरून काढल्याच्या नोटीस कुरियर द्वारे आम्हाला पाठवल्या आहेत. या तुटपुंज्या पैशात आम्ही आमचे घर कसे चालवायचे असा सवाल देखील त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केला आहे.

मात्र या ६७ कामगारांच्या पाठीशी आता कामगार भारती ही संघटना उभी राहिली असून संघटनेचे संस्थापक सरचिटणीस हिराजी पाटील यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून या कामगारांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे.या वेळी काँग्रेसचे पेन शहर अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी कामगारांसोबत आहोत कामगारांवर अन्याय सहन केला जाणार लोकभारतीचे सरचिटणीस हिराजी पाटील सर हे अन्याय झालेल्या कामगारांना न्याय मिळवून देतील असे त्यांनी सांगितले. यावेळी आम्ही हिराजी पाटील यांच्या पाठीमागे भक्कम पणे उभे राहून त्यांना साथ देणार आहोत.असे बोलताना सांगितले हिराजी पाटील सर यांचीदरम्यान याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.