आशा सेविकांचे मानधन वाढवून वेळेवर द्या – अॅड मनोज भुजबळ

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या आशा सेविकांना उल्हासनगर महापालिकेप्रमाणे मानधन वाढून आणि वेळच्या वेळी देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र

 पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात काम करीत असलेल्या आशा सेविकांना उल्हासनगर महापालिकेप्रमाणे मानधन वाढून आणि वेळच्या वेळी देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून डॉक्टर आणि  आरोग्यसेवकांच्या बरोबरीने आशा सेविका काम करीत आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, आजारी नागरिकांची माहिती गोळा करून महापालिकेला देणे इत्यादी कामे आशा सेविका धोका पत्करून करीत आहेत. पण त्यांच्या कामाची दखल घेतली जात असताना दिसत नाही . त्यांना मिळणारे एक हजार रुपये मानधन ही वेळेवर दिले जात नाही.उल्हासनगर महापालिकेने आशा सेविकांच्या कामाची दखल घेऊन त्यांचे मानधन दहा हजार रुपये केले आहे.  त्यामुळे  नगरसेवक अॅड . मनोज भुजबळ यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना पत्र देऊन आशा सेविकांचे मानधन दहा हजार रुपयांपर्यंत वाढवावे आणि ते वेळच्या वेळी देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.