लग्नघरालाच लागली आग, बस्ता अन् दागदागिने सारेकाही जळून भस्मसात

महाड(mahad) तालुक्यातील करमर येथील रहिवाशी मोतीराम मोरे यांच्या घरात येत्या ५ एप्रिलला लग्न असल्याने घरामध्ये लग्नाचे सामानसुमान, बस्ता, दागदागिने ठेवलेले होते. संध्याकाळी मोतीराम मोरे यांचा मुलगा गावात पत्रिका वाटण्यासाठी गेला होता. ते स्वतः दुसरीकडे जेवायला गेले असताना त्यांच्या घराला अचानक आग(house fire in karmar village) लागली.

  महाड: महाड(mahad) तालुक्यातील रायगड (raigad)खोर्‍यातील सावरट ग्रामपंचायत हद्दीतील करमर(fire in karmar villagE) गावातील मोतीराम मोरे यांच्या घराला आज अचानक आग लागली. या आगीत घराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  महाड तालुक्यातील करमर येथील रहिवाशी मोतीराम मोरे यांच्या घरात येत्या ५ एप्रिलला लग्न असल्याने घरामध्ये लग्नाचे सामानसुमान, बस्ता, दागदागिने ठेवलेले होते. शुक्रवारी संध्याकाळी मोतीराम मोरे यांचा मुलगा गावात पत्रिका वाटण्यासाठी गेला होता. ते स्वतः दुसरीकडे जेवायला गेले असताना त्यांच्या घराला अचानक आग लागली. ग्रामस्थांनी तातडीने ही आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला.

  burnt house in karmar

  उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीचा भडका उडून संपुर्ण घर आगीत भस्मसात झाले. या आगीचे लोण शेजारील घरापर्यंत जाऊन त्या घरानेही पेट घेतला. त्यामुळे हे दुसरे पेटलेले घर विझवण्यावर ग्रामस्यांनी भर दिला. मोतीराम मोरे यांचे घर व घरातील सामान, दागदागिने या आगीत भस्मसात झाले. या आगीत मोरे यांचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले आहे.

  आग लागली असे समजताच आमदार भरत गोगावले यांनी तातडीने तहसीलदार, प्रांताधिकारी ,एमएसईबी, पोलीस निरीक्षक यांना फोन करून घटनास्थळी जाण्यास सांगितले. शासकीय अधिकारी यांनी ताबडतोब तिथे जाऊन पंचनामा केला.

  यावेळी पोलीस निरीक्षक नितीन गवारे , तलाठी महाडिक, ग्रामसेवक लांगी, महाराष्ट्र वाहतूक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे, सावरट सरपंच शिवाजी पिसाळ,शाखा प्रमुख गणेश मोरे, भगवान मोरे , दिपक कुंडले व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.