शासनाची परवानगी घेऊनच लग्न समारंभ आयोजित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पनवेल : लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण . या क्षणाला आपल्या सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र- मैत्रिणींनी हजेरी लावावी असे प्रत्येक तरुण - तरुणीला वाटत असते. पण कोरोनामुळे आता ते

 पनवेल : लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण . या क्षणाला आपल्या सगळ्या नातेवाईकांनी आणि मित्र- मैत्रिणींनी हजेरी लावावी असे प्रत्येक तरुण – तरुणीला वाटत असते. पण कोरोनामुळे आता ते शक्य नाही. लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादित उपस्थितीत  सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. या नियमांचे पालन न केल्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्यानेच शुभ मंगल सावधान.लग्नसमारंभासाठी विनंती अर्ज प्राप्त झाल्यास या अर्जाच्या अनुषंगाने कोविड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्याच्या संदर्भात शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना विचारात घेऊन पनवेल महानगरपालिका क्षेत्र वगळून लग्नसमारंभात परवानगी देण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. 

शासनाच्या महसूल व वन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने ३१ मे २०२० च्या आदेशान्वये  करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन दरम्यान गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केवळ ५० लोकांच्या मर्यादित सोशल डिस्टन्सिंग पाळत लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी दिली आहे.   पावसाळा सुरु झाल्यामुळे खुले, लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, सभागृह, घर व घराच्या परिसरात पन्नास लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टन्सिंग तसेच कोविड-१९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर लग्न समारंभ पार पाडण्यास परवानगी देण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त तसेच जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्रातील नागरिकांनी संबंधित तहसिलदारांच्या पूर्वपरवानगीने लग्न समारंभ कार्यक्रम पार पाडले जातील, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. अन्यथा लग्न समारंभ केल्याबद्दल गुन्हा दाखल होऊ शकतो.