pratapgad

महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड ३६० मशालींमुळे उजळून निघाला. प्रतापगड वासियांकडून मातेच्या मंदिरास ३६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव(pratapgad mashal mahotsav) आयोजित करण्यात आला होता.

नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत असत. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशाल महोत्सव साजरा करायचा की नाही असा प्रश्न त्यांना पडला होता. तरी काही मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीत मशाल महोत्सव कोरोनाची भीती न बाळगता, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धुक्याच्या काळोखात  संपन्न झाला.

उपस्थित शिवभक्तांनी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर उद्भवलेले कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी तसेच पुढच्या वर्षी हा मशाल महोत्सव उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली. भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोष करून मशाली प्रज्वलित करत तुतारीचा नाद करत गड दणाणून निघाला.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजाऱ्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.