माथेरानमध्ये लॉकडाऊनचा बळी, व्यवसाय नसल्याने अश्वचालकाने घेतला गळफास

कर्जत: मुंबईपासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ १७ मार्चपासून पर्यटन व्यवसायासाठी बंद आहे. व्यवसाय बंद असल्याने अश्वचालकांंची उपासमार सुरू आहे, लॉकडाऊन उठत नसल्याने अखेर एका ४३

 कर्जत: मुंबईपासून सर्वात जवळ असलेले माथेरान हे पर्यटनस्थळ  १७ मार्चपासून पर्यटन व्यवसायासाठी बंद आहे. व्यवसाय बंद असल्याने अश्वचालकांंची उपासमार सुरू आहे, लॉकडाऊन उठत नसल्याने अखेर एका ४३ वर्षीय अश्वचालकाने आत्महत्या करून स्वतःला संपवून घेतले. विदर्भातील असंख्य कामगार माथेरानमध्ये हातरिक्षा ओढण्याचे आणि अश्वचालक म्हणून काम करतात. लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद असल्याने ते आपल्या घरी काहीही मदत पाठवू शकत नाहीयेत. परिणामी ते नैराश्याच्या छायेखाली वावरत आहेत. 

सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असुन राज्य सरकारने या परिस्थितीला नियंत्रणात आणण्याकरिता लॉकडाऊन वाढवल्याने राज्यात अनेक मजूर अडकुन पडले आहेत. अशातच माथेरान येथे घोड्यावर चालकाचे काम करण्यासाठी आलेल्या आणि मुळच्या वाशिम जिल्ह्यातल्या असलेल्या विलास कांबळे यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेतील मृत विलास कांबळे गेल्या ५ वर्षांपासुन पंचवटी नगर माथेरान येथील अशरद महाबळे या घोडे मालकाकडे मजुर कामासाठी राहत होता.लॉकडाऊनमुळे येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्यामुळे हातातील कामच बंद झाले आता आपल्या कुटुंबाचा प्रपंच कसा चालवावा या विचाराने चिंताग्रस्त असलेल्या विलासला लॉकडाऊनमुळे गावाकडे जाणेही शक्य नव्हते . यामुळे पत्नी मुलांच्या विरहाने मानसिक तणावाखाली आल्याने ९ मे रोजी महाबळे यांच्या घरा शेजारील घोड्यांच्या तबेल्यात या मजुराने गळफास घेतल्याची येथील स्थानिकांमध्ये चर्चा  आहे. या घटनेची माहीती माथेरान पोलिसांना मिळताच  घटनास्थळी धाव घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी पानपट्टे,पोलीस शिपाई श्याम जाधव, यांनी घटनेचा पंचनामा करुन माथेरान पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.