पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे राजकीय वैमनस्यातून सख्ख्या भावाने केली भावाची हत्या

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे राजकीय वैमनस्यातून झालेल्या भांडणात सख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी

पोलादपूर: पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे राजकीय वैमनस्यातून झालेल्या भांडणात सख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे  तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी गावाजवळील गुरांच्या गोठ्याजवळ घडली आहे.

या घटनेची फिर्याद मृत व्यक्तीचा मुलगा अतुल मांढरे यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवून  ७ जणांना अटक केली असून ४०  जणांवर गुन्हे दाखल केले आहेत ७  जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून समजलेले सविस्तर वृत्त असे की, माटवण येथील गणपत मांढरे व सखाराम विश्राम मांढरे हे सख्खे भाऊ असून पूर्वीपासून यांच्यात व गावात शेकाप, शिवसेना असा वाद असल्याने वैमनस्यातून काल
सायंकाळी ५  वाजताच्या सुमारास जुन्या गोष्टीचा राग मनात धरून काही मंडळी जमवून पूर्वीचा राग मनात धरून राजकीय पूर्ववैमनस्यातून गणपत मांढरे यांना रस्त्यात अडवून कोणत्यातरी हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सखाराम मांढरे व विठ्ठल मस्के यांच्यासह ३८ जणांवर गुन्हे दाखल केले आणि ७ जणांना ताब्यात घेतले आहे.
या पार्श्वभूमीवर माटवण गावात राजकीय तनाव निर्माण झाल्याने तणावाचे वातावरण असल्याने गावात  पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात आला आहे
या घटनेनंतर आमदार भरत गोगावले, युवा नेते विकास गोगावले, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, मानगाव येथील डी वाय एस पी  काशीद यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत .