कोरोनाबाधित रुगणाला नेण्यासाठी अद्ययावत यंत्रणेचा उरणमध्ये अभाव

उरण: कोरोनाचा विळखा उरण पनवेलला पडला आहे. यावेळी शहरात किंवा तालुक्यातील कोणत्याही भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित दवाखान्यात नेण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणेचा प्रामुख्याने अभाव

उरण: कोरोनाचा विळखा उरण पनवेलला पडला आहे. यावेळी शहरात किंवा तालुक्यातील कोणत्याही भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित दवाखान्यात नेण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणेचा प्रामुख्याने अभाव जाणवत आहे. तरी ही यंत्रणा लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे. देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. उरणला कोरोनाबाधित १ महिला व १ पुरुष असे २ दोन रुग्ण पॉझिटीव्ह सापडले असल्याने उरणकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बाधित रुग्णाच्या आजूबाजूचा परिसर सीलबंद केला आहे. हे रुग्ण हे नवी मुंबई दवाखान्यात दाखल असताना कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. या २ रुग्णांमधील एक उरण कोटनाका येथील तर दुसरा जेएनपीटी टाऊनशीप कॉलनी येथील आहे. परंतु एखादा कोरोनो रुग्ण शहरात किंवा तालुक्यात आढळला तर त्या बाधित रुग्णास नेण्यासाठी लागणारी सुसज्ज रुग्णवाहिका, सेफ्टी जॅकेट व इतर सुविधांचा अभाव जाणवत आहे. उरणमध्ये आणखीन कोरोना बाधीत रुग्ण आढळले तर त्यांना इतर दवाखान्यात नेण्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा लवकरात लवकर उपलब्ध करावी, अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे. याबाबत उरण नगरपालिकेने या यंत्रणेसाठी पाठपुरावा केला असून ती लवकरच उपलब्ध होतील,अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख महेश लवटे यांनी दिली.