दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत -म्हाप्रळ पूल २ दिवसांनी झाला सुरू, खा.सुनील तटकरेंच्या प्रयत्नांना यश

म्हसळा : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावातील लोकांना आजूबाजूला शहराकडे जाण्यासाठी आंबेत पूल हा महत्वाचा दुवा आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना

म्हसळा :  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावातील लोकांना आजूबाजूला शहराकडे जाण्यासाठी आंबेत पूल हा महत्वाचा दुवा आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदी जोडमार्गावरील आंबेत – म्हाप्रळ पूल वाहतुकीसाठी आणि नागरिकांना रहदारीस तीन दिवसांपासुन प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता. आंबेत पूल बंद केल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ, पंदेरी, बाणकोट आदी शेजारील गावांमधील लोकांना बाजारहाट, वैद्यकीय सेवा सुविधा घेण्यासाठी माणगाव, गोरेगाव, महाड, अलिबाग ठिकाणी जावे लागते. त्यातच शेतीचा हंगाम जवळ आल्याने अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यासाठी दोन जिल्ह्यातील लोकांना आंबेत पूल मार्ग हा एकमेव महत्त्वाचा दुवा आहे. सध्या आंबे काढणी व खरेद विक्री सुरू असल्याने आंबा बागायतदारांना आजूबाजूच्या गावांमध्ये जावे लागते. आंबेत मार्गच बंद करण्यात आल्याने आणि लॉकडाऊन कालावधीत लोकांच्या दैनंदिन व्यवहारात पुरता खोळंबा पडला असताना आणि अत्यावश्यक सेवेची गरज असताना आंबेत मार्ग बंद केल्याने त्याचा परिणाम म्हाप्रळ येथील बाजारपेठेवर तसेच मुख्य शहरातील अत्यावश्यक सेवेवर होत होता.

आंबेत पूलमार्ग पुर्ववत चालु करण्यासाठी लोकांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांचेकडे मागणी केली असता खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड, रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्कयाडे संपर्क साधून दोन दिवस बंद करण्यात आलेला हा मार्ग सुरू करण्यास सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकुन खासदार सुनिल तटकरे यांना धन्यवाद देत असल्याचे आंबेत येथील समाजसेवक नाविदभाई अंतुले यांनी माहिती देताना सांगितले. 

वास्तविक पाहता रहदारी बंद करून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव थांबवता येणार नाही. तर लॉकडाऊन कार्यकाळात अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त लोकांनी विनाकारण बाहेर फिरायला जावु नये, या कालावधीत शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आहे. परंतु कोरोनाबाधित लोक न ऐकल्याने आपले देशात व राज्यात अशा प्रकारचे रुग्णांत वाढ होत आहे. अशा कारणाने आंबेत रत्नागिरी पूल मार्ग हा मुख्य रहदारीचा मार्ग बंद झाल्याने लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती ती खासदार सुनिल तटकरे यांचे प्रयत्नाने वेळीच सुटल्याने येथील जनतेने खासदार व जिल्हा प्रशासनास धन्यवाद दिले आहेत.