म्हसळा दुर्गवाडी चिरेगाणीदेवी मंदिर रस्त्याचे भूमिपूजन

म्हसळा : खासदार सुनिल तटकरे(mp sunil tatkare) यांनी श्रीवर्धन(shreewardhan) मतदारसंघातील विकासकामांना सुरुवात केली आहे.  मार्च २०२० पुर्वी शासन मंजुरी कामांच्या पूर्ततेसाठी छोटेखानी भूमिपूजन(bhoomipujan) कार्यक्रम करण्यात येत आहेत. म्हसळा दुर्गवाडी-चिराठी येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले चिरेगाणीदेवी मंदिराकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्ता बांधकामाचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

रस्ते अनुदान योजने अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या रस्त्याचे संपन्न झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत जिल्हा परिषद कृषि सभापती बबन मनवे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, नगरसेविका सेजल मांडवकर,गटनेते संजय कर्णिक, शिवसेनेचे पदाधिकारी बालशेठ करडे, संतोष मांडवकर,करण गायकवाड आदी मान्यवर ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते.

म्हसळा शहरातील नगर पंचायत हद्दीत ४ किमी अंतरावरील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या चिरेगाणी देवी मंदिराशेजारी दुर्गवाडी आणि चिराठी ही दोन गावे मध्य ठिकाणी वसलेली आहेत. येथे अनेक वर्षे रहदारीचा व अन्य सेवा सुविधांचा अभाव होता. मात्र आता ही परिस्थिती बदलेल असा विश्वास इथल्या लोकांना वाटत आहे.