म्हसळा तालुक्यात शासकीय अनुदानातील सुमारे १२ कोटींचे झाले वितरण – २२ कोटीचे पंचनामे पूर्ण

म्हसळा निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरुड, माणगाव,अलिबाग या तालुक्याना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील बाधित नागरिकांसाठी शासनाकडून

म्हसळा  निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरुड, माणगाव,अलिबाग या तालुक्याना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील बाधित नागरिकांसाठी शासनाकडून आणि विविध सामाजिक संस्थांचे स्तरावर मदत करण्यात येत आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने प्रति कुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ, ५ लिटर रॉकेल मोफत देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात लाखो घरांची व फळबागायतींची पडझड झाली असून अनेक झाडे उन्मळून पडली. यानंतर ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे भेट देऊन नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने आणखी ३०१ कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे आता एकूण मदतीची रक्कम ३७३ कोटी झाली आहे. यापैकी २४२ कोटी रुपयांची मदत ही उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी असल्याची माहिती त्याच वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व खासदार सुनिल तटकरे यांनी दिली होती.

म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतीतील प्रत्येक गाव वाडींत पूर्णतः घरे कोसळणे, अंशतः घरे पडणे, झोपडया पडणे, गुरांचे गोठे, दुकान, टपरी पडणे असे अनेक प्रकार झाले. तालुक्यात अशा प्रकारच्या १५ हजार ५७९ दुर्घटना घडल्या व त्यात ७ हजार ८३ लाभार्थ्यांचे अपरीमीत नुकसान झाले. सुमारे रु.२१ कोटी ९८ लक्ष २८ हजार ३३९ नुकसानीचे पंचनामे झाले असून एक मनुष्य जिवीत हानी, ३१ मृत जनावरे, ३ पोल्ट्री फॉर्म, १८३ पूर्णतः पडलेली घरे, १४ हजार ४९४ अशंतः पडलेली घरे, २३ झोपड्या, ७८१ गुरांचे गोठे, ६३ दुकान टपऱ्या आहेत. तालुक्यातील काही आपद ग्रस्ताना रु.११ कोटी ८७ लक्ष २० हजार २६१ चे अनुदान वितरीत झाले असल्याचे महसुल विभागाने सांगितले.

तालुक्यात ९६ अंगणवाडी इमारती, ६ तलाठी कार्यालये, २२ माध्यमिक शाळा इमारती, १०२ प्राथमिक शाळा इमारती, ३७ ग्रामपंचायत कार्यालय, ५ जि.प.आरोग्य विभागाच्या इमारती, पंचायत समिती कार्यालय असे एकूण रु.८कोटी ७३ लक्ष ५ हजार २१० चे शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील ४४२५ बाधित शेतकऱ्यांचे १८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा क्षेत्र १३४८.०९ हेक्टर, काजू ३८९.५ १ हेक्टर, नारळ ५ ०.२० हेक्टर, सुपारी २९.३१ हेक्टर इतर फळपिके ४६.५० हेक्टर बागायती क्षेत्रात नुकसान झाले असल्याचे तहसीलदार शरद गोसावी यांनी सांगितले. फळपिकांसाठी शासन पूर्वी रू.१८ हजार प्रति हेक्टरी नुकसान देत असे यावेळी निर्सग चक्रीवादळात महाविकास आघाडी सरकार बागायत दारांना रू.५० हजार प्रति हेक्टरी नुकसान देणार आहे.
म्हसळा तालुक्यातील आपदग्रस्ताना रु.११ कोटी ८७ लक्ष २० हजार २६१ चे अनुदान वितरीत झाले असून उर्वरीत अनुदान उपलब्ध आहे. लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणीही पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही. – शरद गोसावी, तहसीलदार म्हसळा