म्हसळा तालुक्यात सापडला दुसरा कोरोना रुग्ण – पाभरे गावातील व्यक्तीला कोरोनाची लागण

म्हसळा :म्हसळा तालुक्यात २६ मे रोजी दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. मुंबईतून पाभरे गावात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील वडाळा येथून १८ मे रोजी एक ४८ वर्षीय

म्हसळा : म्हसळा तालुक्यात २६ मे रोजी दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. मुंबईतून पाभरे गावात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील वडाळा येथून १८ मे रोजी एक ४८ वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबांसमवेत मूळ गावी मौजे पाभरे येथे आला होता. पाभरे येथे या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर पुढील तपासणी व उपचारासाठी या रुग्णाला अलिबाग येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांचे स्वॅब घेऊन ते कोव्हीड-१९ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल २६ मे रोजी पॉझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पाभरे ग्रामपंचायतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावातील एका मृत व्यक्तीचा अहवाल कोव्हीड-१९ पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार जणांना अलिबाग येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी एका १४ वर्षीय मुलीचा अहवाल आज निगेटीव्ह आला आहे. तर इतर तीन जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर काटे यांनी दिली आहे.