म्हसळ्यात गावठी दारू विक्री व हातभट्टी चालविणाऱ्यांविरोधात २ गुन्हे दाखल

म्हसळा : देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन असतानाही म्हसळा तालुक्यातील चिखलप आदीवासीवाडी येथे हातभट्टी रसायन करणे आणि

 म्हसळा : देशात तसेच राज्यात कोरोना विषाणूंच्या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन असतानाही म्हसळा तालुक्यातील चिखलप आदीवासीवाडी येथे हातभट्टी रसायन करणे आणि दारू विक्री करण्याबाबत २ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या बंद कालावधीत संपुर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकारी रायगड यांनी बार व परमीट रूम तसेच दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे  गुन्ह्याची नोंद करून बाळाराम ब पवार  व रमेश कानू पवार  यांना म्हसळा पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामराव कराडे अधिक तपास करीत आहेत.