म्हसळ्यात दहा हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त

म्हसळा :रायगड जिल्ह्यातील म्हसळा माणगाव या रस्त्यावर असणाऱ्या साई सहारा इमारतीच्या गाळयात दहा हजार किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. म्हसळ्यामध्ये नुकतेच मौजे म्हसळा माणगाव रोडवर साई

 म्हसळा :रायगड जिल्ह्यातील म्हसळा माणगाव या रस्त्यावर असणाऱ्या साई सहारा इमारतीच्या गाळयात दहा हजार किंमतीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. म्हसळ्यामध्ये नुकतेच मौजे म्हसळा माणगाव रोडवर साई सहारा इमारतीच्या गाळा क्र.३ मध्ये हा  प्रकार घडला आहे. एकूण २ आरोपी आहेत. राज्यात सर्व कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार होत असल्याचे पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी संचारबंदीचे आदेश दिले असताना आरोपी यांनी एकुण ७३ नग डीएसपी ब्लॅक डिलक्स व्हिस्की दारूच्या प्रत्येकी १८० मिली इंग्लिश दारूच्या बाटल्या लोकाना बेकायदेशीर विक्री करण्याकरता बाळगल्याने आरोपी यांनी आपल्या कृतीने लोकांना कोरोना रोगाचा प्रसार होवु शकतो हे माहीत असुनही हयगयीचे व घातकीपणाचे कृत्य करून शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचा भंग केला. या गुन्ह्यात एकूण १०,२२०/- रुपये किमतीची विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.