बदलत्या वातावरणामुळे म्हसळ्यातील आंबा बागायतदार हवालदिल – शासनाकडून मदतीची अपेक्षा

म्हसळा : दक्षिण रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून खराब आणि बदलत्या हवामानामुळे म्हसळा तालुक्यातील आंबा बागायतदार हवालदिल झाले असून तयार झालेला आंबा कसा विक्री करायचा या चिंतेत आहेत. नुकताच १४

 म्हसळा : दक्षिण रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून खराब आणि बदलत्या हवामानामुळे म्हसळा तालुक्यातील आंबा बागायतदार हवालदिल झाले असून तयार झालेला आंबा कसा विक्री करायचा या चिंतेत आहेत.

नुकताच १४ व १६ मे  रोजी कोकणात जोरदार वाऱ्यासाहित पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा पीक तयार झालेला असून पावसामुळे खराब झाला व जोरदार वाऱ्यामुळे आंबा फळ मोठ्या प्रमाणात गळून पडले आहे. तसेच गुरांच्या वैरणीसुद्धा भिजल्या आहेत.सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसमुले लॉकडाऊन सुरू असून अनेक मोठमोठ्या बाजारपेठ बंद आहेत. ग्रामीण भागातील बागायतदार मोठ्या संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खूप मोठा असून या परिस्थितीतुन सावरण्यासाठी बागायतदारांना शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे, अशी मागणी होत आहे.
 
 एकीकडे देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट आलेले आहे. त्यातच आता थोड्या दिवसात पावसाळा सुरुवात होईल. सध्या कोकणात आंबा फळ पीक तयार झाला असून त्याची विक्री करण्यासाठी शेतकरी चिंतेत आहे. म्हसळा तालुक्यात मागील काही दिवसांपासुन वातावरण खूप बदल झाला आहे आणि त्यातच काही प्रमाणात पाउस देखील पडला आहे. अगोदरच शेतकरी व बागायतदार वर्ग कोरोना, लॉकडाऊन यांनी त्रस्त झालेला आहे. आणि आता तयार झालेल्या व झाडावर तयार होत असलेल्या आंबा फळपीकाची पाऊस व बदलत्या वातावरणामुळे होत असलेली नासाडी यामुळे आंबा बागायतदार आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे शासनाने स्थानिक कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ पंचनामे करून आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी. 
                                                                                                           – संदिप चाचले, माजी उपसभापती तथा सदस्य पंचायत समिती म्हसळा
 
 शेतकरी कोरोनामुळे वैतागला असून त्यात निसर्गाचे कोप सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ आकाश, अवकाळी पाऊस तर कधी जोराचा वारा तर कधी गारा अशा पद्धतीचा वातावरण आंबा पिकासाठी घातक ठरते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे ? आपल्याकडे १४ व १६ मे रोजी पडलेल्या पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाढलेल्या उष्णणेतेमुळे आंबा फळाला साखा (डाग) आला आहे. तरी शासनाने त्वरित आंबा बागांची पाहणी करून घेण्याचे आदेश द्यावेत व नुकसान भरपाई म्हणून मदत द्यावी. – अहमद कौचाली (तोराडी – बंडवाडी)  आंबा बागायतदार शेतकरी