म्हसळा तालुक्यातील एका माणसाने आजाराला कंटाळून केली आत्महत्या

म्हसळा : म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ गावातील ५५ वर्षीय इसमाने आजाराला कंटाळुन गावातील सार्वजनिक इमारतीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना काल रात्री घडली. या घटनेची

 म्हसळा : म्हसळा तालुक्यातील मौजे वारळ गावातील ५५ वर्षीय इसमाने  आजाराला कंटाळुन गावातील सार्वजनिक इमारतीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना काल रात्री घडली. या घटनेची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेची खबर घेतली असता वारळ गावातील चंद्रकांत  टावरी  यांनी गावातील गुरुदत्त मंडळ, मोठी आली येथील सामाजिक इमारतीचे लाकडी वाशाला नायलॉन दोरी बांधुन गळफास लावुन आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची खबर मृताच्या मुलाने पोलीस ठाण्यात दिल्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत इसम हा मुळव्याधाच्या आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त होता म्हणूनच त्याने आत्महत्या करण्याबाबत टोकाची भूमिका घेतली असल्याचे समजते.