लॉकडाऊनमध्ये आंब्याच्या पेट्या बेकायदेशीररित्या घेऊन जाणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल

म्हसळा :कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशासह महाराष्ट्र अडचणीत सापडला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन असून संचार बंदी लागू केली आहे. कोरोनाची साखळी

 म्हसळा : कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण देशासह महाराष्ट्र अडचणीत सापडला आहे. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन असून संचार बंदी लागू केली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व खबरदारी म्हणून गावागावात कोरोना संसर्ग नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाद्वारे कोरोनाचे बाबत माहिती देण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका असे सरकारी व निमसरकारी कर्मचारी महत्वाची भूमिका बजावत आहेत. असे असताना म्हसळा तालुक्यातील एका शिक्षकाने लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन करून बेकायदेशीर काम केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हसळा तालुक्यातील पाष्टी केंद्रांतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भापट या शाळेतील उपशिक्षक अजय सोपान केंद्रे (सदस्य – ग्रा.पं.कोळवट कोरोना संसर्ग नियंत्रण पथक) सध्या राहणार – म्हसळा (कर्जत येथील पत्ता :- गणेश सोसायटी, नानामास्तर मुद्रे, कर्जत) या शिक्षकाने म्हसळा ते कर्जत असा मारुती सुझुकी गाडीने प्रवास करून बेकायदेशीररित्या व धोकादायक पध्दतीने आंब्याच्या पेट्या घेऊन जाण्याचे काम केले आहे. बेकायदेशीररित्या आंब्याच्या पेट्या घेऊन म्हसळा ते कर्जत असा प्रवास केल्याचे आढळून आल्याने कर्जत पोलिसांनी दोन लाखांचा माल व एक मारुती सुझुकी व्हॅन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.