म्हसळा शहराची पाणी योजना १० वर्षांपासून अपूर्णच – नक्की पाणी मुरते कुठे ?

श्रीकांत बिरवाडकर, म्हसळा : म्हसळा शहरासाठी असलेली योजना ही शहरातील नागरिकांना अद्यापही मुबलक पाणी देऊ शकत नाही. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर त्यांच्या गरजादेखील तितक्याच वाढत

श्रीकांत बिरवाडकर, म्हसळा : म्हसळा शहरासाठी असलेली योजना ही शहरातील नागरिकांना अद्यापही मुबलक पाणी देऊ शकत नाही. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर त्यांच्या गरजादेखील तितक्याच वाढत आहेत. त्यासाठी पाणी योजना नवीन आखून ती पूर्ववत करण्यासाठी आजही प्रशासनासह लोक प्रतिनिधी हतबल झाले आहेत.

म्हसळ्यात जुनीच पाणी योजना सुरु करण्याचा आग्रह करत नवा ठेकेदार नेमत काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे जरी असले तरी मात्र या वर्षी पाणी काही म्हसळेकरांना मिळणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण ही योजना ग्रामपंचायत असताना मंजूर झाली होती. म्हसळा शहरासाठी सुधारित म्हसळा नळ पाणी योजना तयार करून २००९ मध्ये ही योजना प्रस्तावित केली. त्या योजनेला डिसेंबर २०१९ मध्ये जल स्थापन समिती यांनी मंजुरी देऊन १ कोटी ६६ लाख ४२ हजार ४७ रुपये एवढ्या रक्कमेचा निधी उपलब्ध करून त्यामध्ये त्यावेळच्या ठेकेदारांनी विहीर खोद काम बांधकाम १५० मी.मी पाईप ४६२ मीटर साईड वर टाकण्यात आला. त्यात देखील ठेकेदारांनी दिरंगाई केली. त्याला १२ मे २०११ ते १९ जुलै २०१२ या कालावधीत ८ वेळा पत्रव्यवहार केले ते काम न केल्यामुळे १३ ऑगस्ट २०१३ च्या सभेतील व १५ ऑगस्ट २०१२ च्या आमसभेतील निर्णयानुसार ती निविदा रद्द करण्यात आली. कामाचे दर कमी असल्याने पुन्हा २०१३-२०१४ च्या दराप्रमाणे १ कोटी ३७ लाख २ हजार १२१ रुपये नुसार सादर केला परंतु २०१६ ला नगर पंचायत रुपांतर झाली. त्यावेळी त्यावेळचे विधान परिषद आमदार सुनील तटकरे यांनी ही योजना जिल्हा परिषदेनी पूर्ण करावी व नंतर नगर पंचायतीने हस्तांतरण करावी असे सांगण्यात आले. परंतु त्यावेळी मा.विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात ३० ऑगस्ट २०१६ रोजी सभा घेऊन त्यावेळी त्यांनी मुख्य अभियंता यांना मूळ मंजूर २००९-१० च्या अंदाज पत्रकातील राहिलेल्या कामाची ई-निविदा प्रक्रिया करण्याबाबत जिल्हा परिषद स्थरावर सांगण्यात आले. त्यावेळी त्या वेळी त्या योजनेच्या ३ वेळा निविदा देण्यात आल्या त्यावेळी चिंतामणी प्रोजेक्ट प्रा.लि.अलिबाग यांनी ही निविदा १७.५० अशा जादा रक्कमेने भरली परंतु एवढी रक्कम न स्वीकारता १४.५० स्वीकाण्यासाठी कार्यकारी अभियंता यांनी १६ सप्टेंबर २०१७ कार्य आदेश दिले. त्या कामासाठी १८ महिन्याची मुदत देत या ठेकेदारांनी ८५८ मी.पाईप पुरवठा करून १३२६, मीटर पाईप जोडून पंप घराचे काम अर्धवट करून तसेच ठेवले आहे. अशा परिस्थितीमुळे म्हसळा शहरावरती पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. ह्या ठेकेदारला काळ्या यादीत टाकण्यासाठी म्हसळा अभियंताने ऑगस्ट २०१९ रोजी रायगड जिल्हा परिषद शाखा अभियंता यांना लेखी पत्रव्यवहार केला आहे.  ठेकेदारावर राजकीय मंडळीचा व लोक प्रतिनिधींचा वरदहस्त आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. म्हणूनच ठेकेदार एवढ्या बिनधास्तपणे वावरत असावा. त्यामुळे ही योजना तो ठेकेदार अर्धवट सोडून आपल्या मनमर्जीनुसार काम करत होता.  आता दिलेला नवीन ठेकेदारदेखील मागच्या ठेकेदाराप्रमाणे असावा. कारण ते पण उडवाउडवीची भाषा करत असल्याने पुन्हा मागील अवस्था होऊ नये कारण या सर्वांचा परिणाम शहरातील हजारो नागरिकांना तसेच प्रशासकीय यंत्रणेला झाला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याही वर्षी म्हसळा शहरवासियांना पाणी पाणी करावेच लागणार आहे.

 कामाला अजुन अवकाश आहे. पाईप मिळत नाही. पाईप मिळाले की नगरपंचायतीला सांगुन काम सुरु करु. – सावंत, नवीन ठेकेदार 
 
 म्हसळा पाणी योजनेचे काम नवीन ठेकेदार सावंत सुरु करणार आहेत. आता धरणातील पिण्याचे पाणी कमी झाले असून अजून काही दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागेल याची आम्हाला पूर्णपणे जाणीव असून नागरिकांनी संयम राखून आम्हाला सहकार्य करावे. – जयश्री कापरे नगराध्यक्षा – नगरपंचायत म्हसळा