mit dakhve photo

आंतरराष्ट्रीय स्तरावरील(international magazine) ‘चीझ’(chez magazine) या डिजिटल मॅगझीनमध्ये महाडच्या मित डाखवे याच्या फोटोला जून २०२० मधील स्पर्धेत तिसरे पारितोषिक मिळाले आहे. जून महिन्याच्या मॅॅगझीनमध्ये त्याचा फोटो प्रकाशित झाला असून या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे मित डाखवे याचे महाडमधून कौतुक होत आहे.

महाड: आंतरराष्ट्रीय स्तरावरील(international magazine) ‘चीझ’(chez magazine) या डिजिटल मॅगझीनमध्ये महाडच्या मित डाखवे याच्या फोटोला जून २०२० मधील स्पर्धेत तिसरे पारितोषिक मिळाले आहे. जून महिन्याच्या मॅॅगझीनमध्ये त्याचा फोटो प्रकाशित झाला असून या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे मित डाखवे याचे महाडमधून कौतुक होत आहे.

चीझ हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रसिद्ध मॅगझीन आहे. संपूर्ण जगातील विविध भागातील छायाचित्रकार या मॅगझीनमध्ये आपला फोटो प्रकाशित व्हावा म्हणून खूप प्रयत्न करीत असतात. अतिशय कठीण अशा कसोटीवर फोटो निवडले जातात. फोटोचा विषय नसल्याने ही स्पर्धा अतिशय कठीण असते. आपला फोटो कोणत्या कसोटीवर निवडला जाईल याचा कोणताही अंदाज नसतानाही फोटो काढणे हे एक कौशल्य असते.

मित डाखवे याने पाठविलेला फोटो कर्नाटकमधील कांबला नावाच्या स्पर्धेचा आहे. दक्षिण कन्नाडमधील ही रेड्यांची स्पर्धा हा एक पारंपारीक उत्सव असतो. तो साधारण नोव्हेंबर ते मार्चमध्ये घेतला जातो. या उत्सवातील मित डाखवे याने काढलेला फोटो चीझ या मॅगझीनच्या स्पर्धेत निवडला गेला. या स्पर्धेत या फोटोला तिसरा क्रमांक मिळाल्याचे नुकतेच घोषित करण्यात आले. मित डाखवे यांनी काढलेल्या फोटोत खळखळत्या पाण्यातील धावत्या रेड्यांचे प्रतिबिंब हेच याच फोटोचे वैशिष्ट्य आहे. असे वैशिष्ट्यपूर्ण फोटोच या स्पर्धेत निवडले जातात.

मित डाखवे याने यापूर्वी अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले आहे. चीझ मॅगझीनच्या या स्पर्धेतील त्याच्या यशामुळे महाड शहराचे नाव देखील उंचावले आहे. मित डाखवे याचे याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.