आमदार प्रशांत ठाकूर यांची वादळग्रस्त वारदोली, बेलवली परिसरातील वाड्यावस्त्यांना भेट

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली याचा फटका पनवेल तालुक्यालाही बसला. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज वारदोली, बेलवली

पनवेल : निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली  याचा फटका पनवेल तालुक्यालाही बसला. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज वारदोली, बेलवली परिसरातील वाड्या वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत लवकरात लवकर संबंधित वादळग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

 निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील लाखो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे लाखो झाडे उन्मळून पडली  आहेत. त्याचबरोबर वाहनांवर महाकाय वृक्ष पडून मोठे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातही बसला. तालुक्यात जवळपास दोन हजार घरांची पडझड झाली आहे. सव्वादोनशे एकर शेतीचे निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. दीड हजारांच्या आसपास झाडे उन्मळून पडली आहेत. सुदैवाने तालुक्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. विशेष करून आदिवासी वाड्या पाड्यांवर मोठे नुकसान झाले आहे. अनेक घराचे पत्रे उडून गेले आहेत. तर काहींच्या घरांच्या भिंतीची चक्रीवादळामुळे पडझड झाली. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल आणि आजही विविध ठिकाणच्या नुकसानग्रस्त भागात जाऊन त्या ठिकाणची पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला. 
 यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे तालुका मंडल सरचिटणीस राजेंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चाचे तालुका मंडल अध्यक्ष आनंद ढवळे, सरपंच बबन पवार, माजी सरपंच जगदिश ढवळे, आप्पा भागीत, संदेश पाटील, जितू बताले, नारायण भोपी, सागर फडके, जगदीश केंगे, नामदेव भूतांबरा आदी उपस्थित होते.आज वारदोली, हालटेप ठाकूरवाडी, बेलवली, तारटेप ठाकूरवाडी आदी ठिकाणी पाहणी केली.  दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी काल नेरे आणि शिरवली परिसरातील आदिवासी वाड्या व पाडयामध्ये भेट देऊन पाहणी केली व नागरिकांना दिलासा दिला.