panvel savinay kaydebhang

पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला गेटवर पोलिस उभे होते येणार्‍या प्रत्येकाचे ओळखपत्र पाहूनच त्याला स्टेशनवर सोडण्यात येत होते. नवीन पनवेल मध्ये बीकानेर आणि निलकमल हॉटेल समोरच खाजगी वाहने, रिक्षा अडवण्यात येत होत्या.

पनवेल : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल मध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळवा यासाठी मनसे तर्फे पनवेल (Panvel) रेल्वे स्टेशनवर सोमवारी सकाळी १०.३० वाजता सविनय कायदेभंग (MNS civil movement) आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना ( protesters ) मुख्य गेटवरच अडवून ताब्यात घेतले.

केंद्र शासनाने अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू केली. त्यामध्ये १० टक्के बँक कर्मचार्‍यांना प्रवास करण्यास परवानगी दिली. कोरोंना लॉक डाऊन नंतर हळू हळू जनजीवन पूर्व पदावर येत आहे. अनेक खाजगी कंपन्या , कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पण या कर्मचार्‍यांना रेल्वे प्रवासाला परवानगी न दिल्याने बेस्टमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळी कार्यालायत जाण्यासाठी आणि संध्याकाळी घरी जाण्यास उशीर होत आहे.अनेक महिला कर्मचार्‍यांचे त्यामुळे हाल होत आहेत.


कोरोंनाचा संसर्ग होऊ नये यासाठी डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. लोकल मध्ये गर्दी झाल्यावर डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही म्हणून परवानगी नाकारताना शासन एसटी मध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी घेण्यास परवानगी देते. त्यामुळे लोकल मध्ये ही सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्यात यावा यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले

यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला गेटवर पोलिस उभे होते येणार्‍या प्रत्येकाचे ओळखपत्र पाहूनच त्याला स्टेशनवर सोडण्यात येत होते. नवीन पनवेल मध्ये बीकानेर आणि निलकमल हॉटेल समोरच खाजगी वाहने, रिक्षा अडवण्यात येत होत्या. पनवेल बाजूला मुख्य गेटवर पोलिस निरीक्षक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त होता. त्याठिकाणी मनसेचे १५-२० कार्यकर्ते केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत आले. त्यांना अडवण्यात आल्यावर त्यांनी आत सोडण्याची मागणी केली ती नाकारून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले