खोपोलीत भाजपतर्फे पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपूर्तीनिमित्त लिहीलेल्या संदेश पत्राचे घरोघरी वितरण

शिळफाटा: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा एक वर्षाचा काळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान मोदी यांच्या संदेश पत्रकाचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे.खोपोलीतही

शिळफाटा: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा एक वर्षाचा काळ पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान मोदी यांच्या संदेश पत्रकाचे घरोघरी वितरण करण्यात येत आहे. खोपोलीतही विविध प्रभागात या संदेशपत्राचे वाटप कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केले. खोपोलीत जिल्हा महिला अध्यक्षा अश्विनीताई पाटील, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, परिवहन सभापती तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, उपाध्यक्ष चंद्रप्पा अनिवार, कृष्णा पाटील, संभाजी नाईक, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, ईश्वर शिंपी, गोपाळ बावसकर, राहुल जाधव, अनिल कर्णूक, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा शोभाताई काटे, स्नेहल सावंत, अश्विनी अत्रे, रसिका शेटे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर, चिटणीस विनायक माडपे, सिद्धेश पाटील, संतोष चौधरी, संजय म्हात्रे, यांसह अनेक कार्यकर्त्यांनी या अभियानात सहभाग घेत पंतप्रधान मोदी यांच्या संदेश पत्राचे वितरण केले. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षभरात घेतलेल्या अनेक कल्याणकारी योजनांची माहिती मोदी यांनी या पत्रात जनतेशी हितगुज करीत नमूद केली आहे.  महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी कारमेल स्कुल परिसरात सॅनिटायझर व मास्कचे याचवेळी वाटप केले. या अभियानाचा समारोप १५ जून रोजी झाला. यानिमित्ताने आत्मनिर्भर भारतासाठी सर्वानी सहकार्य करण्याचे आवाहन अश्विनी पाटील यांनी  केले.