मोटार सायकल चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगारांना अटक

पनवेल : लॉकडाऊनच्या काळात मोटार सायकल चोरी करणार्‍या तीन आरोपींना नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून ४,५८,०००/- किमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.

पनवेल : लॉकडाऊनच्या काळात मोटार सायकल चोरी करणार्‍या तीन आरोपींना नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने  अटक करून त्यांच्याकडून ४,५८,०००/- किमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात मोटार वाहन चोरीचे गुन्हे घडत असल्याने नवी मुंबई आयुक्तांनी मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेला त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते . या शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांना नवी मुंबई व ठाणे परिसरातून मोटार सायकल चोरी करणारे सराईत गुन्हेगार उरण परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचूना नुरुलहक जैनुलाबद्दीन लब्बाई , आफाक मुस्तफा शेख  व एक बालक यांना ताब्यात घेतले.  त्यांच्याकडे अधिक चौकशी केली त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. आरोपींकडून ७ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ४,५८,०००/- रुपयांच्या मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. या कारवाईप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहा.पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, पो.ना.नवनाथ कोळेकर, सचिन धनवटे, पो.हवा.पावरा, बनकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.