lazor lighting on raigad

खा. श्रीकांत शिंदे(shrikant shinde) यांनी पुरातत्व विभागाच्या(archeology department) परवानगीने राजसदर त्याचप्रमाणे गडावरील महत्वाच्या ठिकाणी लेझर प्रकाशाची रोषणाई(lazor lighting) केली. मात्र खासदार संभाजीराजे(sabhajiraje) यांनी या रोषणाईबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवजयंतीच्या दिवशी करण्यात आलेली ही डिस्कोथेक प्रकारची रोषणाई गडाचे महत्व कमी करणारी आहे. त्यामुळे रायगडच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणूनच ओळखला जाईल अशा शब्दांत त्यांनी या प्रकारावर टीकास्त्र सोडले होते.

    महाड: किल्ले रायगडावर(fort raigad) शिवजयंती(shivjayanti) दिनी करण्यात आलेल्या लेझर रोषणाईची(lazor lighting) हेटाळणी डिस्को थेक(discotheque) या शब्दांत करत हा दिवस काळा दिवस असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी, खेदजनक आणि तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारे असल्याची खंत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी किल्ले रायगडवर बोलताना व्यक्त केली. खरं तर अशी रोषणाई वर्षाचे ३६५ दिवस करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. तसेच डिस्कोथेकमध्ये मी कधी गेलेलो नसल्याने तिथली लाईट कशी असते हे मला माहीत नाही, असेही ते म्हणाले.

    शिवजयंती दिनी किल्ले रायगडवर विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी खा. श्रीकांत शिंदे यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली होती. मात्र निधीअभावी अशी रोषणाई करण्यास पुरातत्व विभागाने असमर्थता व्यक्त केल्यानंतर खा. श्रीकांत शिंदे यांनी पुरातत्व विभागाच्या परवानगीने राजसदर त्याचप्रमाणे गडावरील महत्वाच्या ठिकाणी लेझर प्रकाशाची रोषणाई केली.

    खासदार संभाजीराजे यांनी या रोषणाईबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवजयंतीच्या दिवशी करण्यात आलेली ही डिस्कोथेक प्रकारची रोषणाई गडाचे महत्व कमी करणारी आहे. त्यामुळे रायगडच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणूनच ओळखला जाईल अशा शब्दांत त्यांनी या प्रकारावर टीकास्त्र सोडले होते.

    काल (शुक्रवारी) रात्री श्रीकांत शिंदे या रोषणाईची पाहणी करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी गडावर आले. त्यावेळेस माध्यम प्रतिनिधींनी संभाजीराजे यांच्या नाराजीकडे त्यांचे लक्ष वेधले. तेव्हा आपण कधी डिस्कोथेकमध्ये गेलो नाही त्यामुळे डिस्कोथेक रोषणाई कशी असते याबद्दल मला काही माहित नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. या रोषणाईमुळे किल्ले रायगडच्या सौंदर्यात भरच पडली आहे. त्यामुळे शिवजयंतीचा दिवस या रोषणाईमुळे रायगडसाठी काळा दिवस आहे असे टोकाचे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

    खरंतर पुरातत्व विभागाने किल्ले रायगडवर कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था करणे आवश्यक आहे. निधीअभावी जर पुरातत्व विभागाला ते शक्य होत नसेल तर आपण ती व्यवस्था कायम स्वरुपी करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.