लॉकडाऊनमध्ये श्रीवर्धन, म्हसळ्यातील वीज कर्मचारी, अधिकारी ठरले योद्धे, ३ तासांमध्ये ५० गावांची सेवा पुर्ववत

म्हसळा : दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, म्हसळा, पोलादपूर या तालुक्यात मेघगर्जना, सोसाट्याच्या वादळी पावसाने विद्युत पुरवठा सायंकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे आधीच लॉकडाऊनमध्ये जनजिवन विस्कळीत

 म्हसळा : दक्षिण रायगडमधील माणगाव, महाड, म्हसळा, पोलादपूर या तालुक्यात मेघगर्जना, सोसाट्याच्या वादळी पावसाने विद्युत पुरवठा सायंकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे आधीच लॉकडाऊनमध्ये जनजिवन विस्कळीत झाले होते याच वेळी म्हसळा तालुक्यात काल सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील किमान ५० ते ६० गावांतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. म्हसळ्या जवळील बनोटी येथे सायं.६ च्या सुमारास हायटेन्शन लाईनचा पोल व तारा तुटल्यामुळे म्हसळा तालुक्यातील गोंडघर फीडर पूर्णपणे अंधारात गेल्यामुळे दिघी, बोर्ली, दिवेआगर, वडवली या भागातील बहुतांश गावे तसेच मेंदडी, खरसई, बनोटी या भागातील गावे अंधारात होती. त्याच सुमारास पाष्टी, मांदाटणे, कोळवट, ताम्हने करंबे, भापट, घुम या परीसरांतील अनेक गावातील गावातून अंधारमय वातावरण होते. परंतु कमीत कमी वेळात व कामगारात म.रा.वि.वि.कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता सतीश वानखेडे यांचे मार्गदर्शनाखाली धीरज बिराजदार, अमोल पालवे, प्रतिक माने हे अभियंता व जेष्ठ वायरमन बाबूराव साळवी, दिनकर शिंदे, प्रकाश साळवी, शैलेंद्र गुलगुले, शैलेश देशपांडे ही मंडळी सतत कामाला लागून सुमारे तीन तासाच्या आत सेवा पूर्ववत केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

 काल सोसाटयाचे वादळ व वाऱ्यामुळे सायंकाळी सर्वत्र अंधार व गाव वेशीवर कोरोनाचे संकट, त्यात घरात सर्वच मंडळी, करमणुकीचे साधन टी.व्ही. बंद, सोशल मिडीयावर रात्र अंधारातच काढावी लागणार अशी चर्चा त्यातच आम्ही म.रा.वि.वि.कंपनीचे आधीकाऱ्याना फोन लावला तर दुरुस्तीचे काम अंतीम टप्प्यांत आहे असे सांगितले आणि अवघ्या तीन तासांत वीज पुरवठा सुरू झाला. कोरोनाच्या संकट काळात म.रा.वि.वि.कंपनीचे कर्मचारी हे योध्देच आहेत.”

                                                                                                                                              – गौरीताई पयेर, खरसई , माजी रा.जि.प.सदस्या