aditi tatkare at shreewardhan

श्रीवर्धन: राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब  माझी जबाबदारी’ (my family myresponsibility)या मोहिमेची सुरुवात श्रीवर्धन तालुक्यात पालकमंत्री आदिती तटकरे(aditi tatkare) यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, श्रीवर्धन(shreewardhan) तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मिशन सुरू झाले असून यासाठी जनतेचे सहकार्य महत्वाचे आहे .

या मोहिमेत श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक तपासणीसाठी श्रीवर्धन तालुक्यामध्ये ९२ पथके तैनात करण्यात आली आहेत .ही पथके दिवसातून दोन वेळा घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहेत .प्रत्येक पथक किमान ५० कुटुंबांची तपासणी घेऊन आरोग्य विषयक माहिती संकलित करणार आहे .

पालकमंत्र्यांसमवेत प्रांताधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी ,मुख्याधिकारी किरण मोरे ,गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे ,नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पुढे संवाद साधताना पालकमंत्री म्हणाल्या की ,महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने योजलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे १२ सप्टेंबर रोजी परिपत्रक निघाले असून श्रीवर्धन नगरपरिषद तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात आली असून आजपासून श्रीवर्धन शहरासह तालुक्यातील विविध गावात तपासणीसाठी यंत्रणा सुरू केली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोणाला आजार आहेत का? त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची ऑक्सिजनची व शारीरिक तापमानाची मात्रा तपासली जाणार आहे.  याची संपूर्ण माहिती शासनाच्या अॅप मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.
शहरी भागाबरोबर ग्रामीण भागात देखील कोविड झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक शिक्षक, एक अंगणवाडी सेविका, एक आशा वर्कर अशी तिघांच पथक असे ९२ पथक तैनात करण्यात आली आहेत. एक पथक एक दिवसाला ५० कुटूंबाच्या तपासणी करणार असल्याचे सांगितले .

ही मोहीम १५ सप्टेंबर २०२० ते २५ ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घेण्यात येणार असून घरातील सर्व सदस्यांचे तापमान, दमा, ताप, खोकला, कोवीडसदृष्य लक्षणे असणा-या व्यक्तीना जवळच्या रूग्णलयामध्ये उपचार घेण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. मोहिमेची सांगता २५ ऑक्टोबर २०२० रोजी होणार असून, पहिली फेरी १५ सप्टेंबर २०२० ते १० ऑक्टोबर २०२० आणि दुसरी फेरी १४ ऑक्टोबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० या कालावधीत घेण्यात येणार असुन पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवस व दुसऱ्या फेरीचा कालावधी १० दिवसांचा असल्याचे सांगितले.