online shopping

नागोठणे : ऑनलाईन शाॅपिंग(online shopping fraud) करण्याच्या नादात येथील एक व्यक्तीला ४० हजार रूपयांचा गंडा घालण्यात आला होता. मात्र नागोठणे पोलीस(nagothane police) ठाण्यातील पोलीस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काॅन्स्टेबल. संतोष म्हात्रे यांनी सायबर सेलच्या मदतीने दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे त्या संबधित व्यक्तीचे गेलेले ४० हजार रुपये त्याच्या खात्यात पुन्हा जमा झाले आहेत. या कामगिरीबद्दल नागोठणे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे नागोठणे परिसरात सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल साॅ कंपनीच्या वर्कर्स काॅलनीमध्ये राहणारे कर्मचारी राजकुमार शिवप्रसाद यादव यांनी अमेझॉन या ऑनलाईन शाॅपिंग ॲप वरुन सहाशे रुपयांची एक साडी आठ दिवसांपूर्वी खरेदी केली होती. मात्र आठ दिवस उलटूनही ही साडी आली नाही. त्यामुळे राजकुमार यांनी इंटरनेट वरुन अमेझॉनचा कस्टमर केअर क्रमांक मिळविला. मात्र हा क्रमांकच बनावट असल्याने या क्रमांकावर संपर्क झालेल्या तेथील व्यक्तीने तुमचा पत्ता चुकीचा असल्याने साडी पोचली नसल्याचे सांगितले. तसेच साडी येण्यासाठी तुम्ही  ‘ॲराॅन पे वाॅलेट’ हे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने राजकुमार यांना त्यांच्या क्रेडिट कार्डमार्फत दहा रुपये ॲराॅन पे वाॅलेटवर पाठविण्यास सांगितले. याच दरम्यान त्या व्यक्तीने राजकुमार यांच्याकडून सर्व तपशील घेतला असल्याने त्याने दोन वेळा २० हजार अशी ४० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती. हा प्रकार ४ आ‌ॅक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ वा. दरम्यान घडला होता.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजकुमार यांनी रविवारीच दुपारी दोन वाजता नागोठणे पोलीस ठाणे गाठले. तेव्हा तेथे कार्यरत असलेले पोलीस हेड काॅन्स्टेबल संतोष म्हात्रे यांनी पोलीस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचे मुंबई नोडल ऑफिसर श्रीराम घोडगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या प्रकाराची सर्व माहिती दिली. त्यानुसार श्रीराम घोडके यांनी त्यांच्या पद्धतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यानुसारच सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फसवणूक झालेले ४० हजार रुपये राजकुमार यांच्या खात्यात पुन्हा  जमा करण्यास आरोपीस भाग पाडले.

या गुन्ह्यात आरोपीचा तपास लागला नसला तरी ४० हजार ही रक्कम परत मिळवून देण्यास नागोठणे पोलीस व सायबर सेल विभागायला यश आले आहे. दरम्यान असे असले तरी ऑनलाईन व्यवहार करताना आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार जपूनच करावेत असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याकडून करण्यात आले आहे.