शुद्ध आणि मुबलक पाण्यासाठी नंदा म्हात्रे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

पेण - पेण तालुक्यातील खारेपाट भागाला मागील अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. या भागातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात अक्षरशः पागोळीचे पाणी साठवून ते वर्षभर पिण्यासाठी

 पेण – पेण तालुक्यातील खारेपाट भागाला मागील अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहावे लागत आहे. या भागातील अनेक गावांमध्ये पावसाळ्यात अक्षरशः पागोळीचे पाणी साठवून ते वर्षभर पिण्यासाठी वापण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा होतोय पण गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शासनाकडे पाण्याच्या बाबतीत विविध प्रकारच्या मागण्या करत काँग्रेसच्या कोकण विभागीय समन्वयक नंदा म्हात्रे या सोमवारी म्हणजेच २९ जून रोजी पेण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. आणि त्यांनी तशा प्रकारचा निवेदन तहसील कार्यालयात सादर केला आहे.

पेण तालुक्यातील शहापाडा धरणा जवळील जलशुद्धीकरण प्रकल्पाची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, सिडकोचा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा, खारेपाटाला पाणी मिळेपर्यंत मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा बंद करावा, तात्काळ टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करून काम तात्काळ सुरू करावे आदी मागण्यांचा समावेश असून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषणाचा इशारा देण्याचे पत्र देताना सोबत तालुका अध्यक्ष अशोक मोकल, ओळखायचे माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते हजर होते. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी समन्वयक नंदा मात्रे  यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जरी १४४ कलम लागू असले तरी उपोषणाला मी बसणारच कोणतीही कारवाई केली तरी मी आता पाटी हटणार नाही.  खारेपाटातील पाण्याचा प्रश्न सोडवल्या शिवाय मी उपोषण सोडणार नाही मरण आले तरी बेहत्तर पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणा मुळे व होणाऱ्या राजकारणामुळे देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे झाली तरी व पेन तालुक्यात पाण्याचा प्रश्न अजून पर्यंत सुटलेला नाही आता ही शेवटची आरपारची लढाई.