नारायण राणे पोलिसांसमोर होणार हजर, मुख्यमंत्र्यांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणी नोंदवणार जबाब

केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane Will Appear In Alibag Sp Office) आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे. नारायण राणे हे सध्या मुंबईत आहेत. ते दुपारपर्यंत अलिबागमध्ये हजर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी जामीनावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane Will Appear In Alibaug Sp Office) आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे. नारायण राणे हे सध्या मुंबईत आहेत. ते दुपारपर्यंत अलिबागमध्ये हजर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

    नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी आज सकाळी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भातील माहिती दिली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी अटक झाल्याच्या दिवशीच रात्री जामीन मंजूर करताना महिन्यात दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. मात्र गेल्या वेळी नारायण राणे यांनी प्रकृतीचं कारण देत हजेरी लावली नव्हती. आज मात्र नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर पहिल्यांदा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. दरम्यान आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जामीन नोंदवला जणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण राणे आज अलिबागमध्ये येणार असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

    नारायण राणे हे आज अलिबागमध्ये स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावणार असून तिथेच त्यांचा जामीन नोंदवून घेतला जाणार आहे. २३ ऑगस्ट रोजी कोकणामधील आपल्या जन-आशिर्वाद यात्रेनंतर पत्रकारांशी बोलताना राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना कानाखाली मारण्याची भाषा केली होती.