"निसर्ग"चक्रीवादळामुळे म्हसळ्यात खंडित झालेला ३९०० ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत

म्हसळा : ३ जूनला आलेल्या निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरण यंत्रणेचे फार मोठे नुकसान होऊन तालुक्यातील सर्वच भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. गावांना वीजपुरवठा पूर्ववत

 म्हसळा : ३ जूनला आलेल्या निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात महावितरण यंत्रणेचे फार मोठे नुकसान होऊन तालुक्यातील सर्वच भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. गावांना वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी स्थानिक व जिल्ह्याबाहेरून आलेले महावितरण व कंत्राटदाराचे अधिकारी व तांत्रिक कर्मचारी अहोरात्र काम करून पहील्या टप्प्यात ११ दिवसानी म्हसळा व आंबेत भागात विद्युत पुरवठा सुरू करण्यात म्हसळा उप विभागाला यश आले आहे.

मुख्य अभियंता श्रीमती पुष्पा चौहान, अधिक्षक अभियंता, पेण दिपक पाटील, अधिक्षक अभियंता वाशी राजाराम माने, कार्यकारी अभियंता,गोरेगाव आप्पासाहेब खांडेकर, कार्यकारी अभियंता, भांडुप सुरेश सवाईराम,उपकार्यकारी अभियंता म्हसळा सतीश वानखेडे,पालघरचे उप कार्यकारी अभियंता यादवराव इंगळे,पवन मौर्य,म्हसळ्याचे A.E.धीरज बिराजदार, मेंदडीचे अमोल पालवे, आंबेत-खामगावचे माने,अल्फाज डांगे,स्वनील मोरे व महावितरणचे फोरमन एन एस. मोरे, आणि कंत्राटदाराचे अधिकारी व तांत्रिक कर्मचाऱ्यानी अहोरात्र काम करून म्हसळा व आंबेत भागात विद्युत पुरवठा सुरू करण्यात यश आले आहे. 

पुढील टप्प्यांत म्हसळा , खामगाव व मेंदडी याभागात विद्युत पुरवठा टप्प्या -टप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रतिक्रिया :-

” म्हसळा तालुक्यात दोन उपकेंद्र, H.T. लाईन १७४ कि.मी.पेक्षा जास्त व L.T लाईन ४५० किमी आहे, निर्सग चक्री वादळामुळे H.T. लाईन ५०ते ६० व L.T लाईन ६० ते ७० किमी पूर्णपणे पडली तर २०७ ट्रान्स्फारमर पैकी तब्बल ५८ ट्रान्स्फारमर कोलॅप्स झाल्याने तालुक्यातील विद्युत वितरण व्यवस्था पूर्ण बंद पडली, आज पहिल्या टप्प्यात म्हसळा ११ व आंबेत ६ ट्रान्स्फारमर कार्यान्वीत झाले असून म्हसळा येथील ३५०० व आंबेत भागातील सुमारे ४०० ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरू झाला आहे, वरीष्ठ कार्यालया कडून आवश्यकती यंत्रणा,साहीत्य मदतनीस उपलब्ध आहे पुढील टप्प्यांत म्हसळा 2nd, खामगाव व मेंदडी याभागात विद्युत पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार “

सतीश वानखेडे,उपकार्यकारी अभियंता म्हसळा 

” पालक मंत्री आदिती तटकरे, राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, उर्जाराज्य मंत्री डॅा.प्राजक्त तनपुरे या तीनही मंत्र्यानी श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग, मुरुड या भागाचा दौरा करून निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण रायगड मधील खंडीत विज पुरवठा पूर्ववत करण्यास सर्व क्षमतेने सक्रिय मदत केल्याने म्हसळा शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरु होत असल्याबद्दल राज्य शासन म.रा.वि.वि कर्मचाऱ्यांचे धन्यवाद” महादेव पाटील – माजी सभापती तथा तालुका प्रमुख शिवसेना