Need to empower girls by giving them self-defense lessons Chitra Salve
मुलींना स्वरक्षणाचे धडे देऊन सबळ करण्याची गरज : चित्रा साळवे

देशभरात शेकडो मुलीवर अत्याचार, अन्याय,बलात्कार सारख्या घटना घडत आहेत.ह्या घटना भारतासारख्या अध्यात्मिकतेचा वारसा असणाऱ्या देशाला भूषवाह नाही. या देशात मुलीला देवी मनाली जाते.तर काही हैवान अन्याय करून मुलींच्या आयुष्याचे मातेरे करत आहेत.

नवी मुंबई : देशभरात शेकडो मुलीवर अत्याचार, अन्याय,बलात्कार सारख्या घटना घडत आहेत.ह्या घटना भारतासारख्या अध्यात्मिकतेचा वारसा असणाऱ्या देशाला भूषवाह नाही. या देशात मुलीला देवी मनाली जाते.तर काही हैवान अन्याय करून मुलींच्या आयुष्याचे मातेरे करत आहेत. त्यासाठी आपल्या मुलींना स्वरक्षणाचे धडे देऊन सबळ करण्याची गरज भासत असल्याचे मत ठाणे प्रकल्प ग्रामीण बिट घनसोलीच्या पर्यवेक्षिका चित्रा साळवे यांनी व्यक्त केले.

कोरोना कालावधीत सोशल डिस्टन्सचे नियम पाळत, प्रकल्प – ठाणे ग्रामीण अंतर्गत घणसोली बिट येथे पर्यवेक्षिका चित्रा दीपक साळवे यांच्या नियोजनाने जागर नारीशक्तीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या. ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक घनश्याम मढवी,सामाजिक कार्यकर्त्या ललिता मढवी,ॲड. ऋतिका मढवी उपस्थित होत्या.

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलीच्या जन्माचे स्वागत,किशोरी मुलींचे पथनाट्य व घोषवाक्य तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत करणे किती महत्वाचे आहे हे ध्यानात घेऊन पर्यवेक्षिका चित्रा साळवे यांनी जागर नारी शक्तीचा हा आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला होता.

घणसोली गावातील नुकत्याच १० वीच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून पास झालेल्या आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थिनी सायली जाधव व अंकिता कांबळे यांना स्वखर्चाने प्रत्येकी १००० रुपयेचे किसान विकास पत्र देऊन सत्कार केला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यास पर्यवेक्षिका घणसोली बिट, अंगणवाडी सेविका सरिता मढवी, मंगल थोरात. प्रमिला मढवी,निलम पाटील,बालिका गलांडे, सुधा वाघमारे, निकिता भोईर, योगिता म्हात्रे, सुनंदा बोरसे यांनी मेहनत घेतली.