नेरळ शहरात सापडला पहिला कोरोना रुग्ण, शहर सील तर ठाण्यात रुग्णावर उपचार सुरू

नेरळ: कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात सोमवारी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून नेरळ शहर सील करण्यात आला आहे. सध्या हा रूग्ण ठाणे येथील वेदांत रुग्णलयात उपचार घेत

 नेरळ: कर्जत तालुक्यातील नेरळ शहरात सोमवारी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून नेरळ शहर सील करण्यात आला आहे. सध्या हा रूग्ण ठाणे येथील वेदांत रुग्णलयात उपचार घेत असून त्यांच्या घरच्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ४ दिवस नेरळ शहर बंद ठेवण्यात आले आहे.   

कर्जत तालुक्यातल्या नेरळ गावातील एक तरुण ऐरोली येथील फार्मा कंपनीत कामाला होता. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली असून सध्या ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. लवकरच त्यांच्या कुटुंबातील सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ गाव सील केले आहे कोणत्याही प्रकारची  गाडी बाहेरून गावात येणार नाही याची काळजी पोलीस प्रशासन घेणार असून या काळात पुढील ४ दिवस नेरळ गावातील बाजारपेठ,भाजीपाला, दूध आदी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत असे नेरळ ग्रामपंचायतने जाहीर केले आहे. सर्वांनी घरात बसावे,घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस तसेच प्रशासन यांच्याकडून करण्यात आले आहे.  कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, नेरळचे पोलीस निरिक्षक अविनाश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी सी. केे. मोरे, कर्जत पंचयात समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पूरी यांनी नेरळ गावात भेट देवून नेरळ शहर सील केले आहे.