पनवेलमध्ये आता रात्रीची संचारबंदी, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत आयुक्तांनी व्यक्त केली चिंता

पनवेलमध्ये १२ ते २२ मार्च या कालावधीत रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी(night curfew in panvel) लागू करण्यात आली आहे. या १० दिवसांमध्ये शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. मात्र दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परवानगी देण्यात आली आहे.

    पनवेल : कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,१२ ते २२ मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी(night curfew in panvel) लागू करण्यात आली आहे. या १० दिवसांमध्ये शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. मात्र दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परवानगी देण्यात आली आहे.

    तसेच २२ मार्चपर्यंत पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यापुर्वी पोलिसांची परवानगी लागणार आहे. उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार,कॅफे, डायनिंग हॉल ५० टक्के क्षमतेने रात्री ११ वाजेपर्यंतच चालू असणार आहेत. मॉल्सहीत सगळ्या प्रकारची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

    दरम्यान, पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे वाढते रूग्ण ही चिंतेची बाब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.